मराठवाड्यातील २२५ मंडळांत पुन्हा पाऊस, जोर ओसरला

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण मंडळांपैकी अर्ध्याअधिक मंडळांत गुरुवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे.
 In 225 circles in Marathwada Rain again, rain slow
In 225 circles in Marathwada Rain again, rain slow

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण मंडळांपैकी अर्ध्याअधिक मंडळांत गुरुवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जवळपास २२५ मंडळांत तुरळक,  हलका, तर काही मंडळांत मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ३१, परभणीमधील २२, उस्मानाबादमधील २५, नांदेड ३४, लातूर ५४, जालन्यातील ३०, तर बीडमधील २३ मंडळांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला. हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी नसल्यात जमा होती. या जिल्ह्यातील केवळ ६ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला.

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (पाऊस मि.मी)

औरंगाबाद जिल्हा ः आडुळ ३४, बोरसर २९.२५,  गारज ५२.५०, देवगाव ३७.२५, नाचनवेल २२.७५.परभणी जिल्हा ः महातपुरी २१, बनवास २१.२५, कोल्हा २४.२५. उस्मानाबाद जिल्हा ः ढोकी ४१.२५, गोविंदपूर ४१.२५. नांदेड जिल्हा ः बिलोली ३९.७५, बाराळी २०.२५,  मुक्रमाबाद २०.२५, हनेगाव २१.२५,  मारखेल २१.२५, माहूर ३२.७५ सिंधी ३८, भारंबा ३८, नरसी २१. लातूर जिल्हा ः हरंगुळ ४४.५०, हलगरा ३६.७५, मदनसुरी ३३, तोंडार ४१.२५, पोहरेगाव २८.२५. जालना जिल्हा ः पिंपळगाव ३२.७५,, केदारखेडा ५६.७५, टेंभुर्णी २३.२५, वाघ्रूळ ३३.५०, विरेगाव ४२.७५, परतूर २०.७५, दाभाडी ४१, ढोकसाळ २१.२५. बीड जिल्हा ः कडा ३१, धानोरा २२.७५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com