agriculture news in Marathi 227 crore rupees distributed for rain effaced farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी राज्य सरकारने २२७ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्याला ११० कोटी, सांगलीला १०२ तर सातारा जिल्ह्याला ५ कोटी रुपये मिळणार आहेत.

यावर्षी राज्यातील विविध भागात २६ जुलै आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा नागरिकांना मोठा फटका बसला होता. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर महसूल विभागाने शुक्रवारी मदतीचा शासन आदेश जारी केला.

कोकण, पुणे आणि अमरावती या तीन विभागातील १२ जिल्ह्यांना मिळून एकूण २२७ कोटी ७३ लाख ८६ हजार ६०० रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे. यात ठाणे जिल्ह्याला २६ लाख ६९ हजार, पालघरला १ कोटी २८ लाख ९९ हजार, रायगडला १ कोटी २ लाख ९३ हजार, रत्नागिरीला ५० लाख ७७ हजार, सिंधुदुर्गला ६० लाख ७८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

पुणे जिल्ह्याला १ कोटी १२ लाख ८७ हजार ५०० रुपये, सोलापूरला ३१ लाख ६२ हजार, अमरावती जिल्ह्याला ३ कोटी ६५ लाख ६७ हजार तर वाशीम जिल्ह्याला १ लाख ७४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...