agriculture news in marathi 23 villages in North Solapur will be surveyed by drone | Agrowon

उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन : सानप

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

सोलापूर : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यास सर्व्हे ऑफ इंडियातर्फे मान्यता मिळाली आहे. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील २३ गावांच्या गावठाणांचे ५ मार्चपासून ड्रोनद्वारे भूमापन सुरु झाले आहे.

सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यास सर्व्हे ऑफ इंडियातर्फे मान्यता मिळाली आहे. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील २३ गावांच्या गावठाणांचे ५ मार्चपासून ड्रोनद्वारे भूमापन सुरु झाले आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली. 

सानप म्हणाले, ‘‘ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचा ग्रामस्थांना फायदा होईल. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, नंदूर, बेलाटी, तेलगाव, तरटगाव, भोगाव, शिवणी, भागाईचीवाडी, दारफळ गावडी, बाणेगाव, खेड, एकरूख, इंचगाव, गुळवंची, पडसाळी, वांगी, साखरेवाडी, तळेहिप्परगा, हगलूर, समशापूर, होनसळ, राळेरास  आणि सेवालालनगर या ठिकाणी ५ मार्चपासून जमिनींचे मोजमाप होईल.’’ 

‘‘सर्व ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन ग्रामसेवक, भूकरमापकाच्या साहाय्याने चुना पावडरने वेळेवर करून घ्यावे. सार्वजनिक मिळकती, शासन मिळकती विशेषतः: रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य माहिती पुरवावी’’, असे आवाहन सानप यांनी केले.

ग्रामस्थांनी करावयाची कामे ः

ग्रामसभेत उपस्थित राहून गावठाण भूमापनाचे महत्त्व, फायदे आणि कार्यपद्धती जाणून घ्यावी, ग्रामपंचायतीच्या अभिलेखामध्ये स्वत:च्या मिळकतीसंबंधी वारस नोंदी, इतर कायदेशीर प्रक्रिया, हस्तांतराच्या नोंदी अद्ययावत कराव्यात. ग्रामसेवकाला भ्रमणध्वनी आणि पत्ते द्यावेत, शेजारी, नातेवाईक, मित्र गावात राहत नसतील, तर त्यांना भूमापनाची माहिती द्यावी. त्यांचेही फोन आणि पत्ते असल्यास द्यावेत, 
ड्रोनद्वारे भूमापनाच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी सीमांकन करावे, सीमांकनाबाबत वाद असल्यास आपल्या हद्दी सीमांकित करून घेऊन ग्रामसेवक, भूकरमापक किंवा भूमापन अधिकारी यांच्या निदर्शनाला आणून द्यावी,
सार्वजनिक, शासकीय, ग्रामपंचायतीच्या मालमत्तांवर कोणी हक्क सांगत असतील, तर त्याची माहिती द्यावी, मालकी हक्काच्या चौकशीवेळी चौकशी अधिकाऱ्यासमोर पुराव्याची कागदपत्रे सादर करावीत, दिवाणी न्यायालये, प्राधीकरण, न्यायाधीशासमोरील दावे, अर्ज, अपील याची माहिती द्यावी.

ग्रामस्थांना होणारे फायदे

शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल,  गावातील घरे, रस्ते,  
शासनाच्या/ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित होईल. मिळकतीचा नकाशा तयार होईल, कायदेशीर हक्काचा अधिकारी अभिलेख मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) स्वरूपात तयार होईल, ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संवर्धन होईल, मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल, मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावांची आर्थिक पत उंचावेल, गावठाण भूमापनाची कार्यपद्धती पारदर्शकपणे राबविली जाईल. ग्रामस्थांना अभिलेख सहज उपलब्ध होतील, प्रशासकीय नियोजनासाठी गावठाण भूमापन नकाशे उपलब्ध होतील, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्रोत निश्चित होतील.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...