तासगावात बेदाण्याला २३० रुपये उच्चांकी दर

230 rupees per kilogram Highest rate to Raisins in Tasgaon
230 rupees per kilogram Highest rate to Raisins in Tasgaon

तासगाव जि. सांगली : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गुरुवारी (ता. १२) नव्या हिरव्या बेदाण्याची आवक झाली. बेदाणा सौद्यामध्ये त्यांना यंदाचा २३० रुपये किलो असा उच्चांकी दर मिळाला. बाजारात १ हजार टन बेदाण्याची आवक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बेदाणा सौद्यामध्ये सतीश ट्रेडिंग कंपनी सतीश माळी यांच्या अडत दुकानात शेतकरी शिवानंद भीमाण्णा (हुन्नुर रा. बिजरगी. जि. विजापूर) यांच्या नवीन हिरव्या बेदाण्यास ८७ बॉक्‍स बेदाण्याला २३० दर मिळाला. रोहिणी ट्रेडिंग कंपनीच्या मुन्ना मुंदडा यांनी तो खरेदी केला. बाजार आवारात सौद्यासाठी ७०,३५० बॉक्‍सची (१०५ गाडी) आवक होऊन प्रत्यक्ष विक्री ४८,२८० (७२ गाडी) विक्री झाली आहे. 

सौद्यात हिरवा बेदाणा १२५ ते २३० रुपये किलो, पिवळा बेदाणा १२० ते २२०, काळा बेदाणा ४० ते ९० रुपये किलो असे दर मिळाले आहेत. सौद्यास बाजार समितीचे सभापती अजित नारायण जाधव, धनाजी पाटील, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील, विवेक शेंडगे, कुमार शेटे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय बोथरा, मनोज मालू, विनित बाफना, केतन सुचक, राहुल बाफना, एम. जे. पटेल, रितेश मज्जेठय्या, पनू सारडा, मुकेश पटेल, किरण बोडके, नितीन मर्दा, योगेश कबाडे व बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी खरेदीदार व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. 

तासगाव बेदाणा बाजारपेठेत यंदा नव्या बेदाण्याची मोठी आवक सुरू आहे. सुरुवातीपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. यावर्षी द्राक्षाचे उत्पादन घटले असल्याने बेदाणा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com