agriculture news in marathi 2300 hectare crop damage due to premonsoon rain in solapur District | Page 2 ||| Agrowon

सोलापूर जिल्ह्यात 'पूर्वमोसमी'चा २३०० हेक्टरला दणका

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

प्राथमिक माहितीनुसार पूर्वमोसमी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात २३०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंबासह आंब्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

सोलापूर : जिल्ह्यात चार- पाच दिवस झालेल्या पूर्वमोसमी पावसाचा पंढरपूर, माढा, मोहोळ, मंगळवेढा तालुक्याला तडाखा बसला. पण त्यातही सर्वाधिक झळ पंढरपूर तालुक्याला बसली. त्यात प्रामुख्याने काढणीला आलेल्या द्राक्ष, डाळिंबासह आंब्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्याशिवाय ज्वारी, गहू आणि हरभऱ्याचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात २३०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी सुरु आहे. १२, १३ आणि १४ एप्रिल असे सलग तीन दिवस तर त्याचा जोर सर्वाधिक राहिला. पावसासोबतच वाऱ्याचा वेगही प्रचंड असल्याने द्राक्षबागांसह अन्य फळबागांचे नुकसान झाले. पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापुरात बेदाण्यासाठी काही बागायतदारांनी द्राक्ष काढणीला उशिरा ठेवली होती. तर काहींच्या उशिराच्या छाटण्या असल्याने काढणीसाठी बागा प्रतिक्षेत होत्या. पण ऐन हंगामाच्या तोंडावरच पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढवल्या. 

पंढरपुरातील करकंब, मेंढापूर, बार्डी या भागात पाऊस आणि वादळवाऱ्याने द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. या नुकसानीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करण्यास सुरवात केली आहे. तसेच नुकसानीची माहिती संकलित करण्यास सुरवात केली आहे.

त्यात द्राक्षबागांसह बेदाण्याचे शेड कोसळल्याचे दिसून आले. त्याशिवाय डाळिंब, आंबा, केळी या फळासह ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, प्राथमिक माहिती नुसार जिल्ह्यातील ३ हजार ८०० शेतकऱ्यांच्या २३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय मंगळवेढ्यातील नऊ गावातील कच्चा घरांची अंशतः पडझड झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...