अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित

संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे बाधित झाली असून, सुमारे २३ हजार ५५५ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शेतजमीन खरडून झालेले नुकसानीचे क्षेत्र ८८१ हेक्टर आहे.
 अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित  23,000 hectares of agriculture in Amravati affected
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित 23,000 hectares of agriculture in Amravati affected

अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे बाधित झाली असून, सुमारे २३ हजार ५५५ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शेतजमीन खरडून झालेले नुकसानीचे क्षेत्र ८८१ हेक्टर आहे. १४२ गावांत पंचनामे पूर्ण झाले असून, २५८ गावांत सुरू आहेत.  अमरावती तालुक्यात १४ गावे व ५०० हेक्टर शेती, भातकुली तालुक्यात १३७ गावे व ६ हजार २२ हेक्टर शेती बाधित आहे. भातकुली तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र ६६९ हेक्टर व चांदूररेल्वे तालुक्यात २७ गावे बाधित व ११९.९२ हेक्टर शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र १५.७९ हेक्टर व बाधित गावांची संख्या ५ आहे. मोर्शी तालुक्यात २ गावे १३९.६ हेक्टर शेती बाधित आहे.  अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशनमोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख जाणून संवेदनशीलतेने ही प्रक्रिया पार पाडावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.  ठाकूर यांनी गतदोन दिवसांत पुसदा, शिराळा, खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू, देवरा, देवरी, ब्राह्मणवाडा आदी अतिवृष्टिग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर या बाबतची कार्यवाही व प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार  उपस्थित होते.  दर्यापूर तालुक्यात मोठे नुकसान  दर्यापूर तालुक्यात १५४ गावे व १२ हजार ८४४ हेक्टर, अंजनगावसुर्जी तालुक्यात ४५ गावे व ३९३ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ७३ गावे व १ हजार १०८ हेक्टर, तर चांदूरबाजार तालुक्यात ४३ गावे व २ हजार५४९ हेक्टर शेती बाधित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com