Agriculture news in marathi 2336 borrowers from Akola Lenders are eligible for loan waiver | Page 3 ||| Agrowon

अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी कर्जमाफीस पात्र

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेत अकोला जिल्ह्यातील २३३६ कर्जदार शेतकरी पात्र ठरले होते.

अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेत अकोला जिल्ह्यातील २३३६ कर्जदार शेतकरी पात्र ठरले होते. अद्याप २८ हजारांवर शेतकरी वंचित असल्याची बाब माहिती अधिकारातून स्पष्ट झाली असल्याची माहिती सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष अरुण इंगळे यांनी दिली.

इंगळे यांनी म्हटले आहे, अकोला जिल्ह्यात ३०४५१ शेतकऱ्यांपैकी २,३३६ शेतकरी पात्र ठरले. अद्याप २८,११५ शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. विदर्भासह मराठवाड्यातील टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा २०१४च्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला होता. त्यानंतर १० एप्रिल २०१५ ला शासन निर्णय जारी करून परवानाधारक सावकाराकडील थकीत कर्ज, मुद्दल व व्याज माफ करण्यासाठी १७१ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला होता. शासन निर्णयातील अटीप्रमाणे कार्यक्षेत्राबाहेरील कर्जदार शेतकरी अपात्र ठरले. 

अकोला शहरातील परवानाधारक सावकारांचे परवान्याचे कार्यक्षेत्र अकोला तालुक्याऐवजी अकोला शहर नमूद करण्यात आल्याने अकोला तालुक्यासह जिल्ह्यातील ३०,४५१ कर्जदार शेतकरी अपात्र ठरल्यानंतर सावकारग्रस्त शेतकरी समितीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असल्याचे म्हटले होते.

उच्च न्यायालयाने कार्यक्षेत्राबाहेरील कर्जदार शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेऊ नका, असा निर्णय २७ एप्रिल २०१७ ला दिल्यानंतर शासनाकडून १३ सप्टेंबर २०१९ला शासन निर्णय काढत कार्यक्षेत्राबाहेरील अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याबाबत कार्यक्षेत्राची अट शिथिल करण्यात आली. त्यानंतर ५ मार्च २०२०ला ६५ कोटी निधी उपलब्ध करून दिला. योजनेची मुदत ३१ मार्च २०२१पर्यंत ठेवण्यात आली. सावकारग्रस्त शेतकरी समितीतर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे नुकतीच माहिती अधिकारात परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेची माहिती मागण्यात आली.

त्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने १५ जुलैला दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयात शपथपत्रात सादर केलेल्या आकडेवारीपैकी २,३३६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. यात १६७३ कर्जदारांचे सोनेतारण परत मिळाले व ६६३  कर्जदार शेतकऱ्यांना सोनेतारण परत मिळणे बाकी आहे. अकोला जिल्ह्यातील २८,११५ परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेतील कर्जदार शेतकरी अपात्र राहिले आहेत, असा आरोप सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष इंगळे यांनी केला आहे.


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...