राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठा

सहा महसूली विभागांतील प्रमुख ४५ धरणांतून साधारण ८२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा मिळतो. त्यापैकी सध्या राज्यात एकूण २३४.०१७ टीएमसी म्हणजे उपयुक्त पाणीसाठ्याच्या २९.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
234 TMC water storage in dams in the state
234 TMC water storage in dams in the state

नगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील प्रमुख ४५ धरणांतून साधारण ८२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा मिळतो. त्यापैकी सध्या राज्यात एकूण  २३४.०१७ टीएमसी म्हणजे उपयुक्त पाणीसाठ्याच्या २९.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागातील एकूण १९ धरणांत सर्वाधिक म्हणजे ८२.६९६ टीएमसी म्हणजे २३.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी ही माहिती उपलब्ध केली आहे. पुणे, कोकणात पाऊस सुरू असल्याने त्या विभागातील धरणात पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

जायकवाडी, उजनी, कोयना या प्रमुख व मोठ्या धरणांसह चांगला पाणीसाठा करणारी साधारण ४५ मोठी धरणे आहेत. या धरणांतून ८२० टीएमसी उपयुक्त पाणी मिळते. या धरणात दरवर्षी जूनमध्ये २५ ते ३५ टक्के पाणी उपलब्ध असते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने व सर्व धरणे भरल्याने यंदा सध्या म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे सध्या २३७.१७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.   नाशिक विभागातील मुळा, भंडारदरा, दारणा, गंगापूर, गिरणा, यासह इतर आठ धरणांतून ९६.४१० टीएमसी उपयुक्त होते. त्यात सध्या २८.५ टक्के म्हणजे २७.१०८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसह प्रमुख धरणांमध्ये १५९.८० टीएमसी पाणी उपलब्ध होते. त्यापैकी ६२.१६५ टीएमसी म्हणजे ३८.९० टक्के पाणी उपलब्ध आहे. नागपूर विभागातील प्रमुख पाच धरणांतून ८५.००३ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होत असतो. सध्या या धरणात ३०.१७ टीएमसी म्हणजे ३५.४९ टक्के पाणी उपलब्ध आहे. अमरावती विभागामधील सात प्रमुख धरणांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ४७.७५५ टीएमसी आहे. सध्या येथे १६.५०५ टीएमसी म्हणजे ३४.५६ टक्के पाणी आहे. 

पुणे विभागातील उजनी, नीरा, कोयना, राधानगरी, खडकवासला, पानशेत यासह प्रमुख १९ धरणांमधील एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३४४.७४५ टीएमसी इतका असून अंदाजे ८२.६९६ टीएमसी म्हणजे २३.९८ टक्के आहे. मुंबई शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाच प्रमुख धरणांचा उपयुक्त पाणीसाठा सुमारे १७.७७३ टीएमसी असतो. सध्या या धरणात ४.२१७ टीएमसी म्हणजे (२३.१७ टक्के) आहे.

गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली होती. यंदा पुणे, कोकण वगळता पुरेसा पाऊस सुरू नसला, तरी हवामान विभागाच्या अंदाजाचा विचार केला तर यंदाही सगळी धरणी भरतील, असा अंदाज आहे.  - हरिचंद्र चकोर, सेवानिवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com