इथेनॉल खरेदीचे विक्रमी २३७ कोटी लिटरचे करार

इथेनॉल खरेदीचे विक्रमी २३७ कोटी लिटरचे करार
इथेनॉल खरेदीचे विक्रमी २३७ कोटी लिटरचे करार

नवी दिल्ली ः देशात केंद्र सरकारने इथेनॉल वापराला चालना देण्याचे धोरण आखले आहे. कारखान्यांसाठी विविध योजना राबविल्याने इथेनॉलनिर्मितीही वाढली आहे. त्यामुळे २०१८-१९ (डिसेंबर-नोव्हेंबर) या काळात देशात तेल कंपन्या आणि इथेनॉलनिर्मिती करणारे कारखाने यांच्यात आतापर्यंतच्या विक्रमी २३७ कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार झाले आहेत, अशी माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेने दिली आहे. केंद्र सरकारने तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल वापराला चालना दिली आहे. त्याअंतर्गत तेल कंपन्यांना इंधनामध्ये २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०१३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यास सांगतिले आहे. ‘‘केंद्राच्या आदेशाप्रमाणे तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी वाढविली आहे. केंद्राने दिलेले इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपन्यांना ३३० कोटी लिटरची आवश्‍यकता आहे. देशात २०१८-१९मध्ये २३७ कोटी लिटर खरेदीचे करार झाले आहेत. त्यापैकी १६० कोटी लिटर इथेनॉल खरेदी कारखान्यांनी केली आहे,’’ अशी माहिती संघटनेने दिली. देशात सरकारने मळीशिवाय इतर काही घटाकांपासून इथेनॉलनिर्मितीला परवानगी दिली आहे. यामध्ये उसाचा रस, खराब झालेले आणि अतिरिक्त अन्नधान्य, कुजलेली बटाटे आणि मक्याचा समावेश आहे. २३७ कोटी लिटर पुरवठ्याचे करार झाले, त्यापैकी बी हेव्ही मोलॅसिसपासून निर्मिती झालेल्या ४५० दशलक्ष लिटर इथेनॉलनिर्मिती आणि पुरवठ्याचे करार झाले आहेत.

देशातील सध्याच्या ३५५ कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती क्षेतेत वाढ होऊन पुढील दोन ते तीन वर्षांत ६०० ते ७०० कोटी लिटर निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातील इंधनामध्ये १५ टक्के जैविक इंधन मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे, असेही ‘इस्मा’ने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com