agriculture news in marathi, 2391 water tankers in state | Agrowon

ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार ३९१ टॅंकर सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणे भरली, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अभूतपूर्व पूर आले. कोयना, उजनी धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली, तर जायकवाडी धरणातही ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला. दुसरीकडे मात्र दुष्काळी मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू तालुक्यांत ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांच्या १ हजार गावे आणि ६ हजार २११ वाड्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत.

पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणे भरली, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अभूतपूर्व पूर आले. कोयना, उजनी धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली, तर जायकवाडी धरणातही ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला. दुसरीकडे मात्र दुष्काळी मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू तालुक्यांत ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांच्या १ हजार गावे आणि ६ हजार २११ वाड्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. टंचाईग्रस्तांची तहान भागवण्यिासाठी २ हजार ३९१ टॅंकर सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. 

मराठवाड्यात सर्वाधिक टंचाई भासत असून, ७८२ गावे, १६८ वाड्यांमध्ये १ हजार ९० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यात बीड जिल्ह्यातील ४६८ गावे, १०९ वाड्यांमध्ये ३९३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र पुराच्या पाण्याखाली गेला असतानाच दुसरीकडे टंचाईच्या झळाही कायम असल्याने पाणी पाणी करावे लागत आहे. चार जिल्ह्यांमधील ५५७ गावे, ३४४० वाड्यांमध्ये ६५४ टॅंकरने पिण्याचे पाणी द्यावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३२४ गावे, १७५९ वाड्यांमध्ये ३८० टॅंकर सुरू आहेत. 

उत्तर महाराष्ट्रातील ४९६ गावे २ हजार ६०३ वाड्यांमध्ये ५९८ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात वाढलेली पाणीटंचाई कायम असल्याने ४०९ गावे २ हजार ४१५ वाड्यांमध्ये ५१२ टॅंकर सुरू आहेत. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील ४३ गावांना ४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कोकण, पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील पाणीटंचाई मिटली आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट रोजी राज्यातील ९ जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त असलेल्या ५२१ गावे ३०७ वाड्यांमध्ये ५३६ टॅंकरने पाणी द्यावे लागत होते. 
 

राज्यातील नऊ ऑगस्टपर्यंत पाणीटंचाईची विभागनिहाय स्थिती 
विभाग गावे वाड्या टॅंकर 
कोकण 0 0 0
उत्तर महाराष्ट्र ४९६ २६०३ ५१२ 
पश्चिम महाराष्ट्र ५५७ ३४४० ६५४ 
मराठवाडा ७८२ १६८ १०९० 
पश्चिम विदर्भ ४३ ४९ 
पूर्व विदर्भ
महाराष्ट्र १८७८ ६२११ २३९१ 
राज्यातील नऊ ऑगस्टपर्यंत जिल्हानिहाय पाणीटंचाईची स्थिती 
जिल्हा गावे वाड्या टँकर 
उत्तर महाराष्ट्र       
नाशिक ६२ १८८ ६३ 
धुळे ९ 
जळगाव १८ १४ 
नगर ४०९ २४१५ ५१२ 
पश्चिम महाराष्ट्र      
विभाग गावे वाड्या टॅंकर 
पुणे ३८ २६७ ४३ 
सातारा १११ ७७३ १३२ 
सांगली ८४ ६४१ ९९ 
सोलापूर ३२४ १७५९ ३८० 
मराठवाडा       
औरंगाबाद ३७ १० ३७ 
जालना ८८ २३ १०१ 
बीड ४६८ १०९ ६९३ 
उस्मानाबाद १२२ १७६ 
लातूर ६७ १८ ८३ 
पश्चिम विदर्भ       
अमरावती 0 ७ 
अकोला ६ 
वाशीम ४ 
बुलडाणा ३१ ३२

 


इतर अॅग्रो विशेष
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...