नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात २४ मंडळात अतिवृष्टी 

हिंगोली: कळमनुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला.
हिंगोली: कळमनुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. ३) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात नांदेड जिल्ह्यातील १८ मंडळे,  हिंगोली जिल्ह्यातील ५ मंडळे,  परभणी जिल्ह्यातील १ मंडळात अतिवृष्टी झाली. शुक्रवारी (ता. २) दुपारनंतर सर्वदूर पाऊस झाला.  

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर  मंडळात १०२ मिमी., सरसम ९६, जवळगांव ८०, किनवट तालुक्यातील किनवट मंडळात  ७२ मिमी , इसापूर १०५, बोधडी १७३, जलधारा १२९, शिवणी १०७,माहूर तालुक्यातील  वानोळा मंडळात ६६, भोकर तालुक्यातील किनी मंडळात ७० मिमी,  हदगांव तालुक्यातील हदगांव मंडळात ६५ मिमी,  मनाठा ६५, आष्टी  ६८, निवघा ८२, तळणी ८७, नांदेड तालुक्यातील वसरणी मंडळात ६५ मिमी, लिंबगांव ६७, तुप्पा ६७ मिमी अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी मंडळात ९२ मिमी,  नांदापूर मंडळात ७८, वाकोङी  ७३, आखाडा बाळापूर ६६ मिमी अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात ७१ मिमी अतिवृष्टी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com