Agriculture news in marathi 24 crore assistance to farmers in Akola | Agrowon

अकोल्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची २४ कोटींची मदत

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

या हंगामात अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी दिलासा देण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. जिल्ह्यात ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांना २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपये मदत जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे.

अकोला  : या हंगामात अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी दिलासा देण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. जिल्ह्यात ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांना २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपये मदत जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे. हा निधी दोन दिवसांपूर्वी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी २४ कोटी ५ लाख ७९ हजार रुपये निधी बँकांकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

यंदा जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी तसेच वेळोवेळी आलेल्या पुरांमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या काळात जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ४१ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातून मूग, उडदाचे संपूर्ण पीक गेले. सोयाबीन पिकानेही दगा देत शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसुल झालेला नाही. कापसावरही बोंडअळी आलेली आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजचा निधी जिल्ह्याच्या वाट्याला २६ कोटी ७८ लाख रुपये आला आहे. 

तालुकानिहाय असा मिळाला निधी
अकोला तालुक्याला पाच कोटी ६६ लाख ३ हजार, बार्शी टाकळी एक कोटी ४२ लाख ९५ हजार, अकोट पाच कोटी १८ लाख २२ हजार, तेल्हारा तीन कोटी १८ लाख ७ हजार, बाळापूर ७ कोटी २७ लाख ७८ हजार, पातूर एक कोटी ६२ लाख २७ हजार, मूर्तीजापूर २ कोटी ४३ लाख ४१ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना देण्यात आला आहे. हा निधी ३३ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील सर्वाधिक ७ हजार १३४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय तेल्हारा ५१३६, पातूर ४४६४, मूर्तीजापूर ३२४०, बार्शी टाकळी ३६४३, अकोला ४१५६, अकोट ४८६५ लाभार्थी शेतकरी आहेत. बँकांना वितरीत केलेला निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...