agriculture news in marathi, 24 percent pending dues of cane farmers in state | Agrowon

राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

पुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एफआरपीनुसार १४ हजार ८८१ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला एफआरपी थकविणाऱ्या ४९ कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अद्यापही २४ टक्के एफआरपी देणे बाकी आहे.

पुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एफआरपीनुसार १४ हजार ८८१ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला एफआरपी थकविणाऱ्या ४९ कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अद्यापही २४ टक्के एफआरपी देणे बाकी आहे.

‘एफआरपी’नुसार राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १९ हजार ६२३ कोटी रुपयांची बिले देणे अपेक्षित होते. तथापि, साखरेला भाव नसल्यामुळे यंदा कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने पूर्ण एफआरपी देता येत नसल्याची भूमिका साखर उद्योगातून घेण्यात आली. साखर आयुक्तालयाला यंदा कारखान्यांकडे जास्त पाठपुरावा करून ‘एफआरपी’ वसुलीवर लक्ष द्यावे लागत आहे.  

‘१५ मार्चअखेर राज्यात किमान सहा हजार कोटींची एफआरपी थकलेली असेल, असा आमचा अंदाज होता. मात्र, थकीत रक्कम चार हजार ९२६ कोटी म्हणजे २४ टक्के इतकी दिसते आहे. ७६ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित रकमेसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

‘कारखान्यांनी १५ मार्चपर्यंत ८३९ लाख टन उसाची खरेदी केली आहे. एफआरपीच्या गणितानुसार २० हजार ६५१ कोटी रुपये कारखान्यांकडून अदा होणे अपेक्षित होते. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार शेतकरी व कारखान्यांमध्ये करार झाल्यास ती रक्कम थकीत गृहीत धरता येत नाही. अशी रक्कम सध्या तीन हजार १२७ कोटी रुपयांची आहे,’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

साखरेचे किमान विक्री मूल्य प्रतिकिलो २९ वरून ३१ रुपये करूनदेखील साखर कारखान्यांमधून मालाची उचल झालेली नाही. साखरेला भाव नसल्यामुळे आतापर्यंत १६६ साखर कारखान्यांना पूर्ण एफआरपी चुकती करता आलेली नाही. 

‘१०० टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या आतापर्यंत अवघी २७ आहे. ५४ कारखान्यांनी एफआरपीमधील ८० टक्क्यांपेक्षा जादा तर ५७ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जादा रक्कम दिलेली आहे. चार कारखान्यांनी मात्र एक रुपयादेखील एफआरपी दिलेली नाही,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशात सर्वांत जास्त उसाचे उत्पादन महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात होते. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे यंदा ११ हजार कोटी रुपये तेथील कारखान्यांनी थकवले आहेत. त्यामुळे हा मुद्दा आता निवडणुकांमध्येदेखील गाजतो आहे. तुलनेत महाराष्ट्रात मात्र चांगला पाठपुरावा होत असल्यामुळे थकीत एफआरपी हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेला नाही. 

कारवार्ई सुरूच राहणार 
राज्यात आतापर्यंत ४९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्रे) देण्यात आलेली आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत केवळ २५८ कोटी रुपये थकीत होते. यंदा ही रक्कम हजारो कोटीत आहे. निवडणुका असल्या तरी एफआरपी वसुली तसेच कारवाईच्या प्रक्रियेत खंड पडणार नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडकलेली एफआरपी मिळवून देण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्यात एक दिवसही खंड पडलेला नाही. हंगाम संपेपर्यंत किमान ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांंत जमा झालेली असेल.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...