नांदेड जिल्ह्यात खतांचा २४ हजार टन साठा शिल्लक

नांदेड जिल्ह्यात खतांचा २४ हजार टन साठा शिल्लक
नांदेड जिल्ह्यात खतांचा २४ हजार टन साठा शिल्लक

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात विविध ग्रेडच्या १ लाख ८८ हजार २८७ टन खतांची उपलब्धता होती. त्यापैकी १ लाख ६३ हजार ३२८ टन खतांची विक्री झाली आहे. अजून २४ हजार ९५१ टन एवढी खते शिल्लक आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयातर्फे यंदा विविध ग्रेडच्या २ लाख ५७ हजार १०० टन खतांची मागणी करण्यात आली. परंतु २ लाख २५ हजार १६१ टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. २०१८-१९ मधील ५५ हजार १०६ टन खते शिल्लक होती.

यंदाच्या (२०१९-२०) खरिप हंगामामध्ये १ लाख ३३ हजार १८१ टन खतांचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये युरिया ४६ हजार ९६८ टन, डिएपी २० हजार ११० टन, एमओपी (पोटॅश) ९ हजार ४७९ टन, सिंगल सुपर फॉस्फेट १० हजार ९८१ टन, संयुक्त खते (एनपीके) ४५ हजार ६४३ टन आदींचा समावेश होता. 

गतवर्षीचा शिल्लक आणि यंदा पुरविलेला मिळून एकूण १ लाख ८८ हजार २८७ टन एवढा खतसाठा यंदा उपलब्ध होता. आजवर १ लाख ६३ हजार  ३२८ टन खतांची विक्री झाली. त्यामध्ये युरिया ५८ हजार २३३ टन, डिएपी ३५ हजार ४७१ टन, पोटॅश ९ हजार ९७६ टन, सुपर फाॅस्फेट ९ हजार ३९५ टन, संयुक्त खते ५० हजार २४५ टन या खतांचा समावेश आहे.

शिल्लकमधील २४ हजार ९५१ टन खतांमध्ये युरिया १ हजार ९८६ टन, डिएपी ३ हजार ५३४ टन, पोटॅश ४ हजार ५८६ टन, सुपर फाॅस्फेट २ जार २०७ टन, संयुक्त खते (एनपीके) १२ हजार ६४६ टन या खतांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com