agriculture news in marathi, 240 candidates applied for Gram Panchayats | Agrowon

अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी २४० उमेदवार रिंगणात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

अकोला : आगामी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक मुदतीपूर्वीच रविवारी (ता. २४) होईल. तर सोमवारी (ता. २५) मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदांसाठी ५२, तर सदस्यपदांसाठी १८८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होईल.

अकोला : आगामी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक मुदतीपूर्वीच रविवारी (ता. २४) होईल. तर सोमवारी (ता. २५) मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदांसाठी ५२, तर सदस्यपदांसाठी १८८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होईल.

राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदांच्या पोटनिवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. यानुसार तेल्हारा तालुक्यातील अकोला रूपराव, मूर्तिजापूर तालुक्यातील कव्हाळा, किनखेड, लंघापूर, शेलूबाजार, अकोला तालुक्यातील मजलापूर, अनकवाडी, बार्शीटाकळी तालुक्यातील चोहगाव, भेंडीसुत्रक, पातूर तालुक्यातील आस्टूल, भंडारज बुद्रुक, कोठरी बुद्रुक, सांगोळा, तुलंगा बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व मूर्तिजापूर तालुक्यातील विरवाडा, अकोला तालुक्यातील पाळोदी, पातूर तालुक्यातील पाडसिंगी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी थेट निवडणुकीद्वारे सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होईल.

या निवडणूक कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३०७ अर्ज दाखल झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बुधवारी (ता. १३) सरपंचपदासाठी २०, सदस्यपदांसाठी ३० इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. गुरुवार (ता. १४)पासून यासाठी प्रचाराला सुरुवात झाली.

जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. यात मूर्तिजापूर तालुक्यातील विरवाडा सरपंचदासाठी तीन, अकोला तालुक्यातील पाळोदी येथे तीन, तर पातूर तालुक्यातील पाडसिंगी येथे दोन उमेदवार सरपंचदाच्या शर्यतीत रिंगणात आहेत.

इतर बातम्या
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
कोल्हापुरात सरासरी ४९ टक्के पावसाची नोंदकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...