नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी योजना बंद

240 water schemes closed due to lack of water in Nagar district
240 water schemes closed due to lack of water in Nagar district

नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. पाणी पातळी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीतही काही भागांत पुरेसा पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. ज्या भागात पाऊस झाला नाही, तेथील वैयक्तिक पाणी योजना केवळ स्रोताला पाणी नसल्याने बंद आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. 

जिल्ह्यामध्ये गावपातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी १४२६ वैयक्तिक पाणी योजना आहेत. गेल्यावर्षी दुष्काळ असल्याने व पाऊसच झाला नसल्याने स्रोताचे पाणी आटले. त्यामुळे वैयक्तिक पाणी योजना पाणी नसल्याने बंद होत्या. स्रोत बंद पडल्याने गेल्यावर्षी जवळपास ७०० वर योजना बंद झाल्या होत्या. त्या गावांत लोकांना टॅँकरने पाणीपुरवठा केला. यंदा सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अगदी सप्टेंबर महिन्यातही अनेक योजना बंद होत्या. मात्र, आक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिकांचे नुकसान झाले. मात्र, जास्तीचा पाऊस झाल्याने ग्रामीण भागात पाणी पातळी वाढीला मदत झाली. बंद पडलेल्या स्रोतालाही पाणी आले. त्यामुळे बंद पाणी योजना सुरू झाल्या.  

अजूनही २९४ पाणी योजना बंद आहेत. १६ योजना पाइपलाइन नादुरुस्त असल्याने, तर २३ पाणी योजना कायमस्वरूपी बंद आहेत. योजनांचे स्रोत दूषित असल्याने त्या योजना बंद आहेत. त्यात स्रोताला पाणीच आले नसल्याने तब्बल २४१ वैयक्तिक पाणी योजना बंद आहेत. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जामखेड तालुक्यात १६, कर्जत तालुक्यात ६९, पारनेर तालुक्यात ४४, नगर तालुक्यात ५२, पाथर्डी तालुक्यात ६१ शेवगाव तालुक्यात ७ व अकोले, श्रीरामपूरमध्ये प्रत्येकी दोन वैयक्तिक पाणी योजना बंद आहेत.  

यंदाही जाणवणार पाणीटंचाई 

जिल्ह्याच्या सर्वच भागात मागील महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पाणी पातळी वाढली. तरी त्यातही अनेक गाव शिवारात पुरेसा पाऊस झाला नसल्याचे पाणी योजनांच्या स्रोताच्या स्थितीवरून दिसून येत आहे. आजच २४१ गावांतील पाणी योजना पाणी नसल्याने बंद असतील, तर त्या गावांना यंदाही गंभीर पाणीटंचाईला समोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com