सोलापूर जिल्ह्यात रमाई आवास योजनेतून उभारणार २४७३ घरकुले

 सोलापूर जिल्ह्यात रमाई आवास योजनेतून उभारणार २४७३ घरकुले
सोलापूर जिल्ह्यात रमाई आवास योजनेतून उभारणार २४७३ घरकुले

सोलापूर : रमाई आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात २४७३ घरकुले उभारली जाणार आहेत. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घरकुलांना मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी सांगितले. २०१९-२० आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत रमाई घरकुल योजनेंतर्गत एकुण २६४५ घरकुल उभारण्याचे उदिष्ट्य होते. मात्र तालुक्यातून २२८ जादा घरकुलांची मागणी आली होती. या जादाच्या मागणीस मंजुरी द्यावी, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. प्रजासत्ताकदिनी झालेल्या या बैठकीत घरकुलाचा दर्जा चांगला असावा. घरकुले उभारताना गुणवत्ता जोपासली जावी, अशा सूचनाही श्री. वळसे-पाटील यांनी दिल्याचे श्री. नवाळे यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते. लवकरच हा निधी मिळाल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल, असेही नवाळे म्हणाले.  मंजुरी मिळालेली तालुकानिहाय घरकुले अक्कलकोट- १८०, बार्शी-३१५, करमाळा- १८०, माढा-१५०, माळशिरस- ३५१, मंगळवेढा -२१०, मोहोळ- २८०, पंढरपूर- ३२६, सांगोला- २४०, उत्तर सोलापूर- ८५, दक्षिण सोलापूर- १५६ (एकूण-२४७३)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com