agriculture news in Marathi 25 to 30 crore loss of watermelon and musk melon producers Maharashtra | Agrowon

पुणे : कलिंगड, खरबूज उत्पादकांचे  २५ ते ३० कोटींचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

मी वर्षभर सहा एकरावर कलिंगड, खरबूजाचे उत्पादन घेऊन पुणे, मुंबई येथील बाजार समित्यामध्ये विक्री करतो. त्यासाठी उन्हाळ्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत कलिंगडाला प्रति किलो १० ते १५ रुपये तर खरबूजाला १५ ते २५ रूपये दर मिळत असतो. परंतु कोरोनामुळे ह्या दरात जवळपास निम्याहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले असून एकरी जवळपास दीड लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. 
- केशव होले, शेतकरी, बिरोबावाडी, ता. दौंड, जि. पुणे 

पुणे ः लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील कलिंगड आणि खरबूज उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना प्रतिकिलो पाच ते दहा रूपयाने विक्री करावी लागली. यामुळे एकरी दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत २५ ते ३० कोटींचा फटका बसला आहे. 

पुणे जिल्ह्यात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर कलिंगड आणि खरबूजाचे पीक घेतले आहे. पुणे जिल्हयात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती अशा तालुक्यांमध्ये कलिंगड, खरबूजाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सध्या पीक काढणीला आले असून लॉकडाऊनमुळे वाहतुकीच्या अडचणी, ग्राहकांचा कमी प्रतिसाद, कमी दर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

मागील वीस ते पंचवीस दिवसापूर्वी कलिंगड, खरबूजाचे उत्पादन सुरू झाले होते. एकरी सरासरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते. लॉकडानच्या आधी कलिंगडाला प्रतिकिलो १० ते १३ रूपये, तर खरबूजाला १८ ते २२ रूपये दर मिळत होता. तर उन्हाळी हंगामात एप्रिल, मे, जून महिन्यात कलिंगड प्रतिकिलो १५ रूपये, तर खरबूज २५ रूपयांपर्यत दर मिळतो. मात्र, सध्या कलिंगडाला प्रतिकिलो ४ ते ५ रुपये आणि खरबूजाला ६ ते १० रूपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान होत आहे. 

शेतकरी सचिन शिंदे म्हणाले, की मी जानेवारीमध्ये खरबूजाची अडीच एकरावर लागवड केली होती. कोरोनाच्या आधी साधारणपणे प्रति किलोला २० ते २५ रूपये एवढा दर मिळत होता. परंतु कोरोनानंतर या दरात घट झाली. त्यामुळे काढलेले खरबूज घरोघरी जाऊन २०० रूपये कॅरेटने (१८-२० किलो) विक्री केली. त्यामुळे अडीच एकरातून अवघे २४ हजार रूपये मिळाले. त्यासाठी ८७ हजार रूपये खर्च झाला होता. तर एकरी सुमारे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. 

कलिंगड, खरबूज उत्पादन घेणारे तालुके 
जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...