खडकवासला धरण साखळी क्षेत्रात २५ ते ५० टक्के जास्त पाऊस

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात २५ ते ५० टक्के जास्त पाऊस
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात २५ ते ५० टक्के जास्त पाऊस

खडकवासला, जि. पुणे :  धरण साखळी क्षेत्रातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार ही धरणात यंदा मुसळधार पाऊस पडला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी पावसापेक्षा २५ ते ५० टक्के ज्यादा पाऊस पडलेला आहे. 

चार ही धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरली आहेत. यात सुमारे २९.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरण भरल्यानंतरही धरणातून सुमारे १४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.या चार धरणात २८ जून रोजी २.२० टीएमसी म्हणजे ७.५४ टक्के किमान पाणीसाठा होता. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात एक जून नवीन मोजण्यास सुरवात केली जाते. मागील काही वर्षात पडलेला पाऊसावरून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाची सरासरी काढली जाते. खडकवासला धरण साखळीतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

धरणाचे नाव दरवर्षी पावसाची सरासरी एक जून पासून पडलेला पाऊस टक्केवारी
खडकवासला ७०५ ९४२ १३३.६१ 
पानशेत २००० २६२५ १३१.२५
वरसगाव २१०० २६३२ १२५.३३
टेमघर २४०० ३५८८ १४९.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com