25 Agricultural Service Centers for the supply of agricultural inputs in each district
25 Agricultural Service Centers for the supply of agricultural inputs in each district

प्रत्येक जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या पुरवठ्यासाठी २५ शेतीसेवा केंद्र 

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते व यंत्रे आदी सेवा देण्यासाठी सहकार विभागाच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात २५ ठिकाणी शेतीसेवा केंद्र स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, जिल्हा बँक तसेच नाबार्डच्या सहकार्याने ही शेतीसेवा केंद्रे चालविले जातील. या बाबत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सोसायट्या, शेतकरी कंपन्यांची बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शेतकरी त्याला लागणारे बी-बियाणे, खते व यंत्रसामग्री ही प्रामुख्याने व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात. काहीवेळा ऐन हंगामात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार होतात. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सेवा सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असलेल्या ग्रामीण भागात खत, औषधी, बियाणे विक्रीचे सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

याबाबत सर्व जिल्हा उपनिबंधकांना त्यांच्या जिल्ह्यातील सक्षम सोसायटी, शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेऊन त्यांची यादी तयार करण्याचे सुचविण्यात आले आहे. राज्यात एकूण २१ हजार १०० प्राथमिक पतपुरवठा संस्था आहेत. त्यापैकी ८५०० आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. यातील १०० संस्थांमार्फत यशस्वीपणे खते, औषधे, बियाणे, यंत्रसामग्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. आता ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ शेती सेवा केंद्र सुरू करण्यात येतील. यातून सहकारी संस्थांना आर्थिक बळकटीसुद्धा मिळावी, असा उद्देश आहे. 

विविध कार्यकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची कृषी निविष्ठा पुरवू शकतात. त्यावर नियंत्रण राहील व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. या उद्देशाने सहकारी संस्था व शेतकरी कंपन्यांसोबत चर्चा करून जिल्ह्यात असे सेवा केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.  - डॉ. प्रवीण लोखंडे, उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com