25-bed hospital is mandatory for factories
25-bed hospital is mandatory for factories

कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारक

राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे पत्र साखर आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच कारखान्यांनी त्यांच्या परिसरात किमान २५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल तयार करून त्याठिकाणी डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची सोय करावी, असेही पत्र आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे.

सोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे पत्र साखर आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच कारखान्यांनी त्यांच्या परिसरात किमान २५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल तयार करून त्याठिकाणी डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची सोय करावी, असेही पत्र आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे.

यंदा ऊस तोडणी यंत्रांची मागणी वाढली आहे. परंतु ही यंत्रे तयार करणाऱ्या दोन कंपन्या आहेत. त्यामुळे वेळेत पुरवठा करणे अशक्‍य असल्याने यंदा सुमारे दोन लाख ऊस तोडणी कामगार येतील, असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांची सोय करावी, कामगारांनी येताना ५० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना आणू नये, असेही आयुक्‍तालयाने कारखानदारांना सांगितले आहे.

वाहतूकदार व कामगारांशी कारखान्यांनी करार केले आहेत. कोरोनामुळे कारखान्यांनी चारशे ते पाचशे यंत्रांची मागणी नोंदविली आहे. आणखी मागणी केली असतानाही यंत्रे उपलब्ध होत नाहीत. दरम्यान, आत्तापर्यंत राज्यातील अवघ्या २० ते २२ कारखान्यांनीच गाळपासाठी अर्ज केले आहेत.

राज्यात यंदा १९० कारखाने सुरू होतील, असा अंदाज असून आत्तापर्यंत काही कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कारखान्यांनी त्यांच्याकडील कामगारांची सोय उत्तमप्रकारे करावी, असे पत्र पाठविले आहे. वैद्यकीय सुविधा देणे, लहान मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, वयस्क व्यक्‍तींना सोबत आणू नये, अशा सूचना दिल्या आहेत. - उत्तम इंदलकर, संचालक, विकास, साखर आयुक्‍तालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com