Agriculture news in marathi 25 bridges under water in Sangli | Page 2 ||| Agrowon

सांगलीत २५ पूल पाण्याखाली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

सांगली : जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. अनेक भागातील पंचवीस पुल पाण्याखाली गेले. ७१ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सांगली : जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. अनेक भागातील पंचवीस पुल पाण्याखाली गेले. ७१ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

चांदोली ते उमदी पर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे सर्वाधिक भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पाणी साचल्याने फळ कुज होऊ लागली असून फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णाची पातळी ३२ फुटापर्यंत पोहोचली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संततधार पावसामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव आणि जत तालुक्यातील ७२ ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. या भागात तील नदी, ओढ यांना महापूर आले. सुमारे सोळा तासांहून अधिक संततधार पाऊस सुरू होता. शेतात पाणी साचले आहे. भुईमूग ऊस व भाजीपाला या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने सांगितले 
आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असलेले खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात बुधवारी (ता. १४) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. जत तालुक्यातील बोर नदीला पूर आला आहे. 

जिल्ह्यात सातत्याने पाऊस असल्याने भाजीपाला पिकांत पाणी साचले. त्यामुळे फळ कुज होऊ लागली आहे. दसऱ्यासाठी फुले विक्रीसाठी येतील, असे नियोजन केले होते. मात्र पावसाने फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही.
- वैभव कोकाटे, वाळवा


इतर बातम्या
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
देऊर शिवारात सिंगल फेज वीज वाहिनी...देऊर, जि. धुळे ः ककाणी, म्हसदी (ता. साक्री)...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
कडेगाव तालुक्यात सत्तर टक्के पिकांचे...कडेगाव, जि. सांगली : तालुक्यात झालेल्या मुसळधार...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
बार्शीत ओला दुष्काळ मागणीसाठी भारतीय...सोलापूर : ओला दुष्काळ जाहीर करा, या मुख्य मागणीसह...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
उसाचे ३१ लाख शेतकऱ्यांच्या बँक...नांदेड : ‘‘महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या...
मोसंबीत अंबिया बहार फायदेशीर ः डॉ....अंबड, जि. जालना ः ‘‘उन्हाळ्यामध्ये पाण्याची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...