Agriculture news in marathi 25 bridges under water in Sangli | Agrowon

सांगलीत २५ पूल पाण्याखाली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

सांगली : जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. अनेक भागातील पंचवीस पुल पाण्याखाली गेले. ७१ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सांगली : जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. अनेक भागातील पंचवीस पुल पाण्याखाली गेले. ७१ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

चांदोली ते उमदी पर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे सर्वाधिक भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पाणी साचल्याने फळ कुज होऊ लागली असून फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णाची पातळी ३२ फुटापर्यंत पोहोचली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संततधार पावसामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव आणि जत तालुक्यातील ७२ ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. या भागात तील नदी, ओढ यांना महापूर आले. सुमारे सोळा तासांहून अधिक संततधार पाऊस सुरू होता. शेतात पाणी साचले आहे. भुईमूग ऊस व भाजीपाला या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने सांगितले 
आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असलेले खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात बुधवारी (ता. १४) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. जत तालुक्यातील बोर नदीला पूर आला आहे. 

जिल्ह्यात सातत्याने पाऊस असल्याने भाजीपाला पिकांत पाणी साचले. त्यामुळे फळ कुज होऊ लागली आहे. दसऱ्यासाठी फुले विक्रीसाठी येतील, असे नियोजन केले होते. मात्र पावसाने फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही.
- वैभव कोकाटे, वाळवा


इतर बातम्या
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...