agriculture news in marathi, 25 businessmen`s lisence cancel In Solapur Market Committee | Agrowon

सोलापूर बाजार समितीतील २५ अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाने पदभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या आणि बाजार समितीचा सेस न भरताही मनमानी कारभार करणाऱ्या सुमारे २५ आडत व्यापाऱ्यांचे परवाने थेट रद्द करण्याची कारवाई केली आहे. या नंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले, तरी त्यांना परवाना पुन्हा देता येणार नाही, अशी पणन मंडळ कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाने पदभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या आणि बाजार समितीचा सेस न भरताही मनमानी कारभार करणाऱ्या सुमारे २५ आडत व्यापाऱ्यांचे परवाने थेट रद्द करण्याची कारवाई केली आहे. या नंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले, तरी त्यांना परवाना पुन्हा देता येणार नाही, अशी पणन मंडळ कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाची बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बाजार समितीतील विविध विषयांवर त्यात चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडत व्यापारी शेतकऱ्यांचा माल विक्री करतात, परंतु पैसे देत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. अनेक व्यापाऱ्यांसंबंधीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेट बाजार समिती प्रशासक व सध्याच्या संचालक मंडळाकडे केल्या होत्या. त्यानुसार नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही कारवाई करण्यात आली.
अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले. याबरोबरच ते बाजार समितीचा सेसही भरत नसल्याचे चौकशीत आढळले. त्यानंतर प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यालाही या व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली होती.
परवाने रद्द केलेले व्यापारी
तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रविकांत पाटील, अविनाश पाटील, एम. आय. कल्याणी, संतोष बणजगोळे, सुरेश जाधव-पाटील, जिलाणी कल्याणी, धानप्पा दहिटणे, नसीर अहमद खलिफा, अनिल हेबळे, म. कैफ ट्रेडर्स, अमन कल्याणी, छोटूभाई बागवान, ताजबाबा ट्रेडिंग कंपनी, कल्याणी ट्रेडर्स, कैलास पौळ, पैलवान ट्रेडर्स, बाबा ट्रेडर्स, काका ट्रेडर्स, आसिफ ट्रेडर्स, रुद्रेश पाटील, महेश बिराजदार, इब्राहीम बागवान, एस. एम. ट्रेडर्स.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...