agriculture news in Marathi, 2.5 crore subsidy missing, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’
मनोज कापडे
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेले २.६५ कोटी रुपये ‘हरविले’ आहेत. केंद्राने पाठवून देखील अनुदान वाटले गेले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने मात्र कानावर हात ठेवत “आमच्याकडे निधी आलाच नाही”, अशी भूमिका घेतली आहे. 

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेले २.६५ कोटी रुपये ‘हरविले’ आहेत. केंद्राने पाठवून देखील अनुदान वाटले गेले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने मात्र कानावर हात ठेवत “आमच्याकडे निधी आलाच नाही”, अशी भूमिका घेतली आहे. 

लाल फितीचा कारभार शेतकऱ्यांची कशी थट्टा मांडतो, सरकार दरबारी निधी कसा हरवितो, शेतकऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सारे जण कसे हैराण होतात, तरीही निधीचा थांगपत्ता कसा लागत नाही, असे अनेक कंगोरे असलेली ‘हरविलेल्या २.६५ कोटींची गोष्ट’ राज्याच्या फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळात रंगली आहे. 

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून राज्यात विविध प्रकारच्या ६० औषधी वनस्पती लागवडींकरिता अनुदान मिळते. ३० ते ७० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची ही जबाबदारी फलोत्पादन मंडळावर टाकण्यात आलेली आहे. राज्यासाठी २०१७-१८ करिता २.६५ कोटी रुपये अनुदान मंजूर केले. मात्र, हा निधी एकाही शेतकऱ्याला न वाटता अधिकाऱ्यांनी दाबून ठेवला, अशी मूळ तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

कृषी खात्याच्या फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने हा निधी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाने पाठविला नाही, असे शेतकऱ्यांना आधी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आरोग्यमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे ही बाब सांगितली. “आमच्याकडे निधी आहे; पण कृषी खात्यानेच संपर्क साधला नाही,” असे उत्तर आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे मग शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालयाकडे तक्रार केली. ही टोलवाटोलवी अजूनही सुरूच आहे. 

अडकवून ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाबाबत आमदार रमेश बुंदिले यांनी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिले. श्री. पाटील यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या बाजूला नागार्जून औषधी वनस्पती फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही समस्या समजावून सांगितली. यामुळे मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अहवालदेखील मागविला आहे. मात्र, प्रश्न सुटलेला नाही. 

मंत्रालयाने मागविलेल्या अहवालाबाबत मंडळाने काय भूमिका घेतली हे सांगण्यास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. “मंत्रालयीन चौकशीबाबत माहिती गोपनीय आहे. मंडळाच्या संचालकाशिवाय या विषयावर बोलू नये अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

मंडळ बेफिकीर आणि अधिकारी मग्रूर ः लाडोळे
नागार्जून औषधी वनस्पती फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे अध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी फलोत्पादन मंडळाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही प्रश्न जैसे थे आहे. कारण, मंडळाचे अधिकारी शेतकरीविरोधी भूमिका घेतात. मंडळाने ‘आयुष’कडे वेळोवेळी पाठपुरावा केला असता तर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असते. मात्र, शेतकऱ्यांना त्रास देण्यात अधिकारी धन्यता मानतात. आजही गावागावातील शेतकरी हक्काच्या अनुदानासाठी डोळे लावून बसले आहेत. मात्र, लालफितीच्या मग्रूर अधिकाऱ्यांना आमच्या व्यथेशी काहीही देणेघेणे नाही,” अशी जळजळीत टीका श्री. लाडोळे यांनी केली आहे. 

निधी आम्ही नव्हे, तर ‘आयुष’ने दाबला 
“कृषी आयुक्त आणि मंडळाचे संचालक यांना मंत्रालयाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती बरोबर आहे. मात्र, हा पैसा कृषी खात्याच्या ताब्यात आलाच नाही. आयुषने चार जानेवारी २०१८ मध्ये मंजूर निधीविषयी मंडळाला कळविले. मंजुरीप्रमाणे निधी द्या असे पत्र मंडळाने ८ फेब्रुवारी २०१८ ला आयुषला दिले होते. मात्र, आयुषने निधी दाबून ठेवला. आम्ही या कालावधीत शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवडीविषयी लेखी मान्यतादेखील दिलेली नव्हती. त्यामुळे या समस्येशी आमचा काहीही संबंध नाही,” अशा शब्दात कृषी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. 
 

इतर अॅग्रो विशेष
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...