agriculture news in Marathi 2.5 crore worth HTBT stock seized in Vidarbha Maharashtra | Page 2 ||| Agrowon

विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा जप्त 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे हब म्हणून विदर्भ नावारूपास आला होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही झाली.

नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे हब म्हणून विदर्भ नावारूपास आला होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही झाली. या वेळी मात्र हंगामापूर्वीच कृषी विभागाने अनधिकृत बियाणे पुरवठादारांच्या मुसक्या आवळत तब्बल अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिकचा साठा जप्त केला. अमरावती आणि नागपूर विभागांत ही कारवाई करण्यात आली. 

तणाला प्रतिकारक (एचटीबीटी) कापूस वाणाला अद्याप केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने परवानगी दिलेली नाही. गेल्या काही वर्षांत या अनधिकृत बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. या व्यवहाराचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज दिले जात नाही. त्यामुळे हे बियाणे न उगवल्यास शेतकऱ्यांना कोठेही दाद मागता येत नाही. काही नवखे शेतकरी मात्र बियाणे माफियांच्या आमिषाला बळी पडत आपले नुकसान करून घेतात. कृषी विभागाने देखील यंदाच्या हंगामात बियाणे माफियांवर कारवाईसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. 

नागपूर विभागात बियाणे माफियांवर आठ कारवाया करण्यात आल्या. या माध्यमातून १५५७३ पाकीटबंद, तसेच चार हजार १०० किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले. या बियाण्यांची किंमत एक कोटी ८९ लाख ७९ हजार ३९३ रुपये आहे. याप्रकरणी तब्बल १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बेला, केळवद, कळमेश्‍वर. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहर, पाटण, गडचिरोली जिल्ह्यात आष्टी व अहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आठ कारवाया करण्यात आल्या. 

अमरावती विभागात सहा कारवायांमध्ये सहा लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातील मानोरा, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तिवसा, यवतमाळ जिल्ह्यात वनी, राळेगाव, दारव्हा या तालुक्यांमध्ये अनधिकृत बियाणेप्रकरणी कारवाई करण्यात आली. मानोरा येथे पाच लाख ९०४ रुपये चांदूर रेल्वे येथे २९ हजार १४६, यवतमाळ येथे एक लाख ८५ हजार ६१४ या प्रमाणे मोठ्या कारवाया करण्यात आल्या. नागपूर विभागाच्या तुलनेत यंदा अमरावती विभाग मात्र कारवायांमध्ये पिछाडला आहे. 

आंध्र प्रदेश, तेलंगणातून आवक 
नागपूर विभागातील काही जिल्ह्यांच्या सीमा या आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाशी जुळलेल्या आहेत. या दोन्ही राज्यांतून मोठ्या प्रमाणावर ‘एचटीबीटी’ची आवक महाराष्ट्रात होते. चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये साठवणूक करून तेथून मग विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जातो. यंदा मात्र कृषी विभागाने पुरवठादारांवरच लक्ष केंद्रित केले. परिणामी, विदर्भात ‘एचटीबीटी’चा अपेक्षित पुरवठा रोखता आला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...