agriculture news in marathi, 2.5 lakh farmers take Pikvima in Solapur | Agrowon

सोलापुरात अडीच लाख शेतकऱ्यांचा पीकविमा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

जिल्हा बॅंकेच्या वैराग शाखेत विमा हप्ता न घेतल्याने मला ऑनलाइन सेवा केंद्रावर फॉर्मसाठी जावे लागले. त्याठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या होतीच, पण काहीसा कमी वेळ लागला.
- महेश रेळेकर, शेतकरी, शेळगाव (आर), ता. बार्शी

शेतकऱ्यांनी पीकविम्याचा अर्ज आणि डीडी थेट बॅंकेत जमा करावा. ही सुविधा फक्त बॅंकेतच उपलब्ध आहे. यामध्ये विमा हप्त्याची रक्कम डीडी स्वरूपात किंवा ऑनलाइन ३१ जुलैच्या तारखेलाच जमा करावी व मूळ अर्ज बॅंकेतच द्यावा. बॅंकेला हा अर्ज ऑनलाइन अपलोड करायला वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे बॅंकेतच तो दाखल होणे आवश्‍यक आहे. तशी सूचना संबंधित विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
- रवींद्र माने, कृषि उपसंचालक, कृषी विभाग, सोलापूर

सोलापूर : ऑनलाइन सर्व्हर डाऊनची समस्या, सात-बारा उतारा मिळण्यातील अडचणीतूनही यंदाच्या खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.३१) दुपारपर्यंत जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी प्रीमियम भरला. गतवर्षीपेक्षा यंदा २५ हजार जादा शेतकऱ्यांनी विमा उतरवला.
अलीकडच्या तीन-चार वर्षांपासून खरिपातही पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७९ हजार हेक्‍टर इतके निश्‍चित केले आहे; पण त्या तुलनेत आजअखेर १ लाख ६२ हजार ६६१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याशिवाय उडीद, मुगाचा समावेश आहे. सोयाबीन आणि तुरीसाठी प्रीमियम भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मंगळवारी दुपारपर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता. गेल्यावर्षी हीच संख्या २ लाख २५ हजार होती.
विम्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी आहे; पण यंदा सुरवातीपासूनच ऑनलाइन सर्व्हर डाऊन, सात-बारा उताऱ्यातील अडचणीमुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरली. गावात सात-बारा उतारा मिळवणे, पीकपेरा दाखला यांसारख्या कागदपत्रांसाठी तलाठ्याच्या मागे फिरण्याची वेळ आली. ऑनलाइन ई-सेवा केंद्रांनी तर शेतकऱ्यांची लूट केली. 

 


इतर बातम्या
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...