Agriculture news in marathi 2.5 lakh tonnes of fertilizer is available for Rabbi in Pune region | Agrowon

पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते उपलब्ध

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. 

एकूण मंजूर खतांपैकी आत्तापर्यंत जवळपास २ लाख ४५ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना खतांबाबत काही अडचणी आल्यास संबंधीत तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.  
पुणे विभागात सुमारे १९ लाख २९ हजार ११३ हेक्टरवर रब्बी पेरणी होण्याचा अंदाज आहे.

पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. 

एकूण मंजूर खतांपैकी आत्तापर्यंत जवळपास २ लाख ४५ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना खतांबाबत काही अडचणी आल्यास संबंधीत तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.  
पुणे विभागात सुमारे १९ लाख २९ हजार ११३ हेक्टरवर रब्बी पेरणी होण्याचा अंदाज आहे.

त्यानुसार खते व बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चालू वर्षी हरभरा, गहू, ज्वारी या पिकांच्या क्षेत्रात प्रामुख्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८ लाख ४७ हजार मेट्रीक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी कृषी आयुक्तालयाने ६ लाख ५० हजार टन खतसाठा मंजूर केला आहे. तालुका पातळीवरील कृषी सेवा केंद्रांना आत्तापर्यंत सुमारे दोन लाख ४५ हजार टन खते उपलब्ध करून दिले आहेत.

चालू वर्षी चांगला पाऊस झाला असून रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात खतांची मागणी नोंदविण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. परिणामी, खतांना मागणी वाढेल असा अंदाज आहे. 

जिल्हानिहाय खतांची मागणी, उपलब्धता (क्विंटल)

जिल्हा प्रस्तावित क्षेत्र मागणी उपलब्धता
नगर  ७,३१,८७० २,७३,००० १,१७,०००
पुणे ४,२५,८४५ २,४३,००० ३२,०००
सोलापूर ७,७१,३९७ ३,३०,००० ९७,०००
एकूण १९,२९,११३ ८,४७,००० २,४५,०००

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...