विमा घेतलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई

विमा घेतलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई
विमा घेतलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई

परभणी ः जिल्ह्यात यंदा उद्भलेल्या दुष्काळी स्थितीमुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. पावसाच्या खंडामुळे तूर पिकाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा अधिक घट अपेक्षित असल्याने तूर पिकासाठी अधिसूचित मंडळातील विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या प्रमाणात २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी विमा कंपनीला आदेश दिले आहेत. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

पावसाचा खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे तूर पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी पडले आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येणार आहे. उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट येणार आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, दुष्काळ निवारण समिती आदी संघटनांनी जिल्ह्यातील पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एकूण विमा संरक्षण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात देण्याची मागणी केली होती. 

कृषी विभागाने देखील त्याअनुषंगाने तूर पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी इफ्फको टोकीयो जनरल इंन्सूरन्स कंपनीला तूर उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत तरतुदीस पात्र ठरलेल्या सर्व विमाधारक तूर उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के पर्यंत आगाऊ नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

तूर पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळगट ः परभणी तालुका ः परभणी, पेडगाव, जांब, झरी, पिंगळी, दैठणा, सिंगणापूर जिंतूर तालुका ः जिंतूर, सांवगी म्हा.२, बामणी, चारठाणा, आडगाव, बोरी, सेलू तालुकाः सेलू, देऊळगाव गात, वालूर, कुपटा, चिकलठाणा, मानवत तालुका ः मानवत, केकरजवळा, कोल्हा, पाथरी तालुका ः पाथरी, हदगाव, बाभळगाव, सोनपेठ तालुका ः सोनपेठ, आवलगाव, गंगाखेड तालुका ः गंगाखेड, महातपुरी, राणीसावरगाव, माखणी, पालम तालुका ः पालम, चाटोरी, बनवस, पूर्णा तालुका ः पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर, चुडावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com