agriculture news in Marathi 25 quintal cotton procured by CCI in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय) कापसाची या आठवड्यात खरेदी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय) कापसाची या आठवड्यात खरेदी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यातच चोपडा (जि. जळगाव) येथील खरेदी केंद्रात कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण सांगून क्विंटलमागे दोन ते पाच किलोची कटती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. 

या आठवड्यात एकामागून एक खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. जळगाव तालुक्यासाठी पाच जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये खरेदी सुरू आहे. परंतु या केंद्रांसाठी एकच ग्रेडर आहे. यामुळे रोज कुठल्यातरी एका केंद्रात खरेदी केली जाते. रोज सर्वच केंद्रांत खरेदी केली जात नाही. यामुळे संबंधित एकाच केंद्रात वाहनांची मोठी गर्दी होते. तसेच विक्रीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रात रात्रभर थांबावे लागते. दुसऱ्या दिवसापर्यंत खरेदी पूर्ण करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना हकनाक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच कारखान्यालाही आपली यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरात आणता येत नाही, अशी स्थिती आहे. यामुळे जळगाव, जामनेर व इतर तालुक्यांत निश्‍चित सर्वच केंद्रांमध्ये रोज खरेदी केली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सीसीआयने जामनेर, शेंदूर्णी (ता.जामनेर), पहूर (ता.जामनेर), बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमध्ये शहादा व नंदुरबार येथे खरेदी सुरू केली आहे. जळगावमध्ये रावेरात खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. पणन महासंघ ‘सीसीआय’चा एजंट म्हणून खरेदी करणार आहे. परंतु महासंघाची खरेदी सुरू झालेली नाही. महासंघाने जळगाव जिल्ह्यात भडगाव, धरणगाव, अमळनेर, यावल, पारोळा येथे खरेदीचे नियोजन केले आहे. तर धुळ्यात धुळे व नाशिक जिल्ह्यांतील येवला व मालेगाव येथेही खरेदी केंद्र निश्‍चित केले आहे. खरेदी मात्र सुरू झालेली नसल्याने या तालुक्यातील कापसाची आवक जळगाव, पाचोरा, चोपडा, भुसावळ, जामनेर येथील सीसीआयच्या खरेदी केंद्रात होत आहे.

क्विंटलमागे पाच किलोपर्यंत कटती
चोपडा येथील खरेदी केंद्रात कापसात ओलावा सांगून क्विंटलमागे दोन ते पाच किलो कटती लावली जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच दरही ५७०० रुपये प्रतिक्विंटल दिला जात नाही. व्यापारी शेतकऱ्यांच्या नावे कापसाची विक्री या केंद्रात करीत आहेत. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर व इतरांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...