agriculture news in Marathi 25 thousand crore profit from ethanol policy Maharashtra | Agrowon

इथेनॉल मिश्रण धोरणामुळे २५ हजार कोटींचा फायदा 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आता दोन वर्षांनी कमी करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे देशाच्या साखर उद्योगाला किमान २५ हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे.

पुणे ः इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आता दोन वर्षांनी कमी करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे देशाच्या साखर उद्योगाला किमान २५ हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इथेनॉल धोरणात केलेल्या बदलाचे साखर उद्योगातून स्वागत केले जात आहे. केंद्राच्या आधीच्या धोरणानुसार २०२५ पर्यंत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य (टार्गेट) ठेवले गेले होते. मात्र आता या कालावधीत पाच वर्षांनी कपात केली गेली आहे. २०२३ पर्यंत मिश्रणाचे लक्ष्य गाठा, अशा सूचना आता देशातील तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) देण्यात आल्या आहेत. 

इथेनॉल मिश्रण धोरणातील या बदलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा पाठपुरावा कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. देशातील साखर उद्योगाला सध्या या दोघांकडून दिशा दिली जात असून, इथेनॉल धोरणात लवचिकता आणण्यासाठी अनेकदा दोघेही संयुक्त प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. 

देशात २०१३-१४ पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण अवघे एक ते दीड टक्क्यापर्यंत होते. त्यामुळे साखर कारखान्यांकडून इथेनॉलची होणारी खरेदीदेखील ३५ ते ३८ लाख लिटरच्यावर जात नव्हती. आता मात्र सरकारने ३८० कोटी लिटरपर्यंत ही खरेदी वाढवल्याने कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळतो आहे. 

उलाढाल ५० हजार कोटींवर जाईल 
‘‘केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण सध्या केवळ ८.५ टक्के आहे. तरीही इथेनॉलपासून २१ हजार कोटी रुपये साखर उद्योगाकडे येत आहेत. मिश्रणाचे प्रमाण प्रत्यक्षात २० टक्क्यांच्या पुढे गेल्यास हीच उलाढाल ५० हजार कोटींच्या पुढे जाईल. त्यामुळे इथेनॉलमध्ये आता साखर उद्योगाला सर्वाधिक भवितव्य दिसते आहे,’’ असे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया 
केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणाच्या नव्या धोरणामुळे देशाच्या साखर उद्योगातील इथेनॉलमधील उलाढाल किमान २५ हजार कोटींनी वाढू शकते. तितका पैसा थेट शेतकऱ्यांच्याच खिशात जाणार आहे. मात्र २० टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी वाटेतील अनेक अडचणी दूर कराव्या लागतील. 
- विकास रासकर, कार्यकारी अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पुणे 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...