agriculture news in marathi, 25 thousand officers, employees need for elections work in Solapur | Agrowon

सोलापुरात विधानसभेसाठी २५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

सोलापूर : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या कामांकरिता सुमारे २५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा आखायला सुरवात केली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या कामांकरिता सुमारे २५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा आखायला सुरवात केली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विधानसभेच्या जिल्ह्यातील मतदारसंघात निवडणूकविषयक कामकाज व्यवस्थित व्हावे, यासाठी योग्य आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करायला सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या चुका टाळून सुरळीतपणे काम व्हावे, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयांत मतदान जागृती मंच स्थापन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध विभागांकडून मनुष्यबळ घ्यावे लागणार आहेत. त्याबाबतची माहिती देताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी केली. अधिकारी, कर्मचारी यांची माहिती देताना त्यांचे ग्रेड वेतन आणि पद यांचा बिनचूक उल्लेख करावा, असे त्यांनी सांगितले. या वेळी ‘एनआयसी’चे स्नेहल होनकळसे यांनी कर्मचाऱ्यांची माहिती कशाप्रकारे दिली पाहिजे, याची माहिती द्यावी, याबाबतीत सविस्तर माहिती दिली.

उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी निवडणूकविषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात काही बदल करणे अपेक्षित असेल, तर ते लवकरच जिल्हा निवडणूक कार्यालयास कळविण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, तहसीलदार डी. एस. कुंभार, तहसीलदर श्रीकांत पाटील उपस्थित होते.

इतर बातम्या
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊससातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...