Agriculture news in marathi, 250 to 2600 per quintal of lemon in the state | Agrowon

राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

अकोला ः येथील बाजारात कागदी लिंबू सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. लिंबाची दिवसाला ३०० ते ४०० कट्टे आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

अकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये

अकोला ः येथील बाजारात कागदी लिंबू सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. लिंबाची दिवसाला ३०० ते ४०० कट्टे आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

कागदी लिंबूसाठी अकोला जिल्हा प्रसिद्ध आहे. अकोला ही प्रमुख बाजारपेठ आहे. जिल्ह्यात वाडेगाव येथूनही दररोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. अकोल्यात सध्या दिवसाला तिनशे ते चारशे कट्टे लिंबू विक्रीला येत आहेत. प्रामुख्याने एका कट्ट्यात १२ ते १५ किलो लिंबे असतात. सध्या थंडी सुरू असल्याने लिंबांची मागणी तितकी नाही. कोरोनामुळे गेले काही महिने कमी प्रमाणात चालणारा हॉटेल व्यवसाय सध्या जोराने सुरू आहे. त्यामुळे थोडा फायदा झाला आहे. सध्या लिंबाचा हंगाम सुरू असल्याने आवक जोरात आहे. गुरुवारी सरासरी ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. किरकोळ विक्री २० रुपयांपर्यंत प्रतिकिलोने केली जात आहे.

जळगावात क्विंटलला १८०० ते २६०० रुपये 

जळगाव ः  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.११) लिंबांची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, एरंडोल, यावल, जळगाव आदी भागांतून होत आहे. लिंबांची आवक स्थिर व दरही टिकून असल्याची माहिती मिळाली. 

सोलापुरात प्रतिक्विंटलला ६०० ते १८०० रुपये दर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबांना बऱ्यापैकी उठाव मिळाला. प्रतिक्विंटलला सर्वाधिक १८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबांची आवक अगदीच जेमतेम राहिली. प्रतिदिन १० ते २० क्विंटलपर्यंत आवक राहिली. सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. लिंबांना प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवक साधारण रोज ३० ते ५० क्विंटल अशीच राहिली. तर प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपये असा दर मिळाला. दरातील किरकोळ चढ-उतार वगळता लिंबांचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते १००० रुपये

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.११) लिंबांची २२ क्विंटल आवक झाली. त्यांना ५०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी ७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ नोव्हेंबरला १४ क्विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. ६ नोव्हेंबरला ११ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. ७ नोव्हेंबरला लिंबांची आवक ३१ क्विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९ नोव्हेंबरला २२ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. १० नोव्हेंबरला १२ क्विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

परभणीत क्विंटलला ८०० ते १२०० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.११) लिंबांची ४० क्विंटल आवक झाली. लिंबांना प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल १२०० रुपये, तर सरासरी १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.सध्या येथील मार्केटमध्ये परभणी, सेलू तालुक्यांतील गावातील शेतकऱ्यांच्या लिंबाची आवक होत आहे.

गेल्या महिन्याभरातील प्रत्येक गुरुवारी लिंबाची २० ते ५० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला ४०० ते १५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) लिंबाची ४० क्विंटल आवक झाली. घाऊक दर प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये होते. तर किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो २० ते ३० रुपये होते, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये  क्विंटलला ९५० ते २०५० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१०) लिंबांची आवक ३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९५० ते २०५० रुपये असा दर मिळाला.सर्वसाधारण दर १४५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.९) लिंबूची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास १००० ते २२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी (ता.८) आवक ३० क्विंटल झाली. त्यास १००० ते २२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. रविवारी (ता.७) आवक ३८-क्विंटल झाली. त्यास १००० ते २२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. 

शनिवारी (ता.६) आवक ३२ क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. शुक्रवारी (ता.५) आवक २८ क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० होते. शुक्रवारी (ता.५) आवक २५ क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० होते. सध्या आवक सरासरी असून कमी -जास्त होत आहे.

पुण्यात प्रतिक्विंटलला २५० ते १००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.११) लिंबांची सुमारे दिड हजार गोणी आवक झाली होती. यावेळी प्रति गोणीला ५० ते २०० रुपये दर होता. थंडी वाढल्याने मागणी घटल्याने दर कमी असल्याचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले. तर एक गोण सर्वसाधारण १५ ते २० किलोंची असते. तर लिंबाच्या आकारमानानुसार एका गोणीमध्ये सुमारे ३०० ते ५०० लिंबे असतात, अशी माहिती मिळाली.

नगरमध्ये क्विंटलला १००० ते १५०० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांची दर दिवसाला १३ ते १५ क्विंटलची आवक होत आहे. लिंबाला प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार ५०० रुपये व सरासरी ५० क्विंटलचा दर मिळत आहे. नगर बाजार समितीत लिंबाची बऱ्यापैकी आवक होत आहे.

६ नोव्हेंबर रोजी ७ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार व सरासरी १५०० रुपये, ४ नोव्हेंबर रोजी १६ क्विंटलची आवक झाली. दर १ हजार ते १५०० व सरासरी १२५० रुपये, २६ ऑक्टोबर रोजी  १९ क्विंटलची आवक होऊन १२०० ते ३ हजार रुपये व सरासरी २२०० रुपयांचा दर मिळाला. २५ ऑक्टोबर रोजी १८ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार व सरासरी २ हजार रुपयांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून लिंबांच्या आवकेत आणि दरात सतत चढ-उतार होत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर  नगर ः नगर येथील दादा पाटील...
काकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...
Top 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
Top 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...
जालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर  : नगर येथील दादा पाटील...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...
रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...
पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
लातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...
कापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...