Agriculture news in marathi 250 acres of sorghum crop destroyed in the Dhebewadi valley | Agrowon

ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांकडून ज्वारीचे २५० एकरातील पीक फस्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

वनविभागाच्या येथील कार्यालयाकडे पीक नुकसानीच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. आवश्‍यक खात्री व कागदपत्रांची पूर्तता करून पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जात आहेत.
- एस. एस. राऊत, वनपाल, ढेबेवाडी.

ढेबेवाडी, जि. सातारा : रानडुकरे आणि गव्यांच्या कळपांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. महिनाभरातच सुमारे २५० एकरातील रब्बी ज्वारीचे पीक त्यांनी फस्त केल्याचे वनविभागाकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे. 

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या डोंगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकल्याने पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे. जवळपास खाद्य उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राण्यांनी आजूबाजूच्या सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला आहे. तेथील शेती वाचवतानाही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. 

काळगाव परिसरात सध्या गव्यांचा, तर ढेबेवाडी खोऱ्यात रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी ज्वारीचे पीक काढणीला आले असतानाच शिवाराच्या शिवारे रातोरात फस्त होऊ लागल्याने शेतकऱ्यांची अवस्था तोंडचा घास हिरावल्यासारखी झाली आहे. खरिपाच्या ऐन पीक काढणीच्या वेळेलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे संकरित ज्वारीचे उभे पीक जागेवरच अंकुरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रवाने हा हंगामही वाया गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. 

दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुकरे जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकऱ्यांची शिवारे गावापासून खूपच लांब आणि आडवळणाच्या ठिकाणी आहेत. रात्री तेथे राखणीला थांबणे शक्‍य होत नाही. तर, सकाळी भुईसपाट झालेले शिवारच त्यांच्या दृष्टीला पडत आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...