अडीच हजार महिला गिरवताहेत आदर्श दुग्धव्यवसायाचे धडे

शाहूवाडी सारख्या ग्रामीण भागात महिलांना एकत्र करणे हे मोठे आव्हान होते. पण आम्ही संस्थेच्या वतीने अगदी तळागाळात जाऊन महिलांना एकत्र केले. त्या काही तरी शिकत आहेत. महिलांसाठी आम्ही महिला एकत्र येऊन त्यांच्यात सुधारणा घडवून आणतो याचे आम्हाला समाधान आहे. - सौ. वैशाली महाडिक- पाटील, अध्यक्षा, आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्था
प्रशिक्षणार्थी महिला
प्रशिक्षणार्थी महिला

कोल्हापूर: त्या अडीच हजार जणी, दुग्धोत्पादनातील छोट्या छोट्या त्रुटी दूर करताहेत, केवळ दुग्धोदत्पादक जनावरांबरोबरच दुधातही वाढ करण्याचे धडे त्या गेल्या दोन वर्षांपासून गिरवाताहेत. ‘दूध उत्पादनवाढीसाठी हेच योजनेचे नाव घेऊन कोल्हापुरातील आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्था गेल्या दोन वर्षांपासून खेड्यापाड्यातील महिलांना सजग करण्याचे व्रतस्थ करण्याचे काम करीत आहे.  दुग्धविषयक तज्ज्ञ आणि थेट गोठ्यात राबणाऱ्या महिला यांच्यात समन्वय साधून या महिलांना दुधाचा व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे सव्वाशेहून अधिक बचत गटातील सुमारे अडीच हजार महिलांना त्यांनी दुग्धव्यवसाय करतानाचे बारकावे सांगून यात निपुणता मिळविण्यासाठी प्रयत्न केला आहे.  महिलांच्या विविध उपक्रमासाठी कोल्हापुरात आनंदीबाई संस्था कार्यरत आहे. त्यांच्याकडे सुमारे सोळाशे बचतगट आहेत. यातून पन्नास हजार महिलांचे संघटन त्यांनी केले. त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये दुग्धव्यवसायाचाही समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा हा दुग्धव्यवसायासाठी पुढारलेला आहे. लाखो लिटर दूध संकलित होत असले तरी गोठ्यातील स्वच्छता, दूध काढताना घेण्याची काळजी, जनावरांचे व्यवस्थापन, दूध संकलनात वाढ होण्याच्या छोट्या टिप्स महत्त्वाच्य ठरतात. अगदी दूध काढताना केस विंचरणे, दुधात केस न येऊ देणे, भांड्याची स्वच्छता या बारीकसारीक बाबी दुधाच्या शुद्धतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आढळतात. हे पाहून संस्थेने नाबार्डचे सहकार्य घेऊन अशा तज्ज्ञांची नियुक्ती करून महिलांना याबाबतचे प्रशिक्षण दिले. केवळ प्रशिक्षण न देता महिलांनी किती सुधारणा केल्या याचा आढावाही संस्थेच्या मार्फत केला जातो. हजारो महिलांनी जनावरांचे व्यवस्थापन, धारा काढताना घ्यावयाची काळजी यामध्ये चांगल्या सुधारणा करून जनावरांची संख्याही गोठ्यात वाढविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com