Agriculture news in Marathi 25,000 agricultural pumps cut off in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज खंडित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करणार नाही, असे आडमुठे धोरण वीज कंपनीने घेतले आहे. यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करणार नाही, असे आडमुठे धोरण वीज कंपनीने घेतले आहे. यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी अडचणीत असताना वीजबिले कशी भरणार, असा प्रश्‍न आहे.

सुमारे २५ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा जळगाव, जामनेर, चोपडा, यावल, पाचोरा, रावेर, भुसावळ आदी भागांत बंद करण्यात आला आहे. चोपडा येथे शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले. पण प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता आपली मनमानी करीत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव, धरणगाव तालुक्यांतही शेतकरी त्रस्त आहेत, पण पालकमंत्री लक्ष देत नाहीत. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे विरोधात असताना वीज कंपनीच्या विरोधात शिंगाडा मोर्चा काढायचे. आता कुठे गेले शिंगाडे, असा संतप्त प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली आहे. कोरडवाहू हरभऱ्याचीच पेरणी झाली आहे. मका, गहू, कांदा आदी पिकांची पेरणी, लागवड रखडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. कारण पेरणीला विलंब होत आहे. 

दुसरीकडे वीज कंपनी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. वीज कंपनीने आकारलेली बिले चुकीची किंवा अवास्तव आहेत. ती कशी शेतकरी भरणार. वीजपुरवठा सुरळीत नाही. रोहित्र खराब झाले आहेत. ते शेतकरी स्वखर्चाने दुरुस्त करतात. तारा जीर्ण आहेत. फ्यूजपेट्या खराब आहेत. कवडीचा दुरुस्ती खर्च वीज कंपनीने शिवारात केला नाही. पण वीजबिले अवास्तव आकारतात. पावसाळ्यात अशी मोहीम का राबविली नाही, असा संतापही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वीजबिल भरणे शक्य नाही. अशात वीज कंपनीने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. रब्बी हंगाम कसा घ्यावा, असा प्रश्न आहे. वीजपुरवठा पूर्ववत करावा. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घ्यावी.
- चंद्रकांत जाधव, शेतकरी, फुपनगरी, जि. जळगाव


इतर बातम्या
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...
पुणे जिल्ह्यातील रिंग रोडच्या...पुणे : ‘‘महाराष्ट्र (एमएसआरडीसी) हाती घेण्यात...
नगर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणूकीत...नगर ः नगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या...
भंडारा जिल्ह्यात २७ लाख क्‍विंटल धान...भंडारा ः जिल्ह्यात आधारभूत केंद्राच्या माध्यमातून...
वाळु प्रकरणात साडेसोळा लाखांचा दंड वरुड, अमरावती : उपविभागीय अधिकारी यांनी जप्त...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...