सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करणार -ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प उभारले जाणार नाहीत, असा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आता २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाणार आहे.
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट  वीजनिर्मिती करणार -ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 25,000 MW by solar energy Will generate electricity - Energy Minister Dr. Nitin Raut
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट  वीजनिर्मिती करणार -ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 25,000 MW by solar energy Will generate electricity - Energy Minister Dr. Nitin Raut

औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प उभारले जाणार नाहीत, असा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आता २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी नवीन धोरण आणले असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषेदत दिली.  शहरातील विविध कार्यक्रमांसाठी ऊर्जामंत्री डॉ. राऊत शहरात आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोडकळीस आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पांबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. वीज निर्मितीसाठी सरकारने नवीन धोरण ठरविले आहे. त्यानुसार आता राज्यात यापुढे नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पांऐवजी सौरऊर्जा प्रकल्पातून राज्यासाठी वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे या विभागात रोजगार मिळणार असून, उद्योग-व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या नवीन धोरणानुसार १७ हजार मेगावॅट सौर वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरीचे काम सुरू आहे. कोरोनाच्या दोन लाटेमुळे त्या प्रकल्पासाठीचे प्रशासकीय कामे रखडली आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बिडकीन (ता. पैठण) येथे उपविभाग सुरू करण्याबाबत मागणी आहे, त्या बाबत विचार सुरू असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.  वीजमाफी नाहीच  राज्यात वीजबिल माफी देणे हे वीज कंपनीचे काम नसून, ते काम केंद्र आणि राज्य सरकारचे आहे. केंद्र सरकारने वीजमाफीबाबत निर्णय घेतल्यास त्यासाठी राज्य सरकार आपली भूमिका पार पाडेल. पदोन्नतीतील आरक्षण संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या संदर्भात भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

सबसिडी बंद केली नाही  मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगासाठी सबसिडी बंद करण्यात आलेली नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. सबसिडी उद्योजकांना मदत करण्यासाठी नव्हे तर उद्योग वाढीसाठी होती. एक महिन्याचा सबसिडीसाठी निधी देणे बाकी आहे. मात्र आमच्याकडे सबसिडी एकाच जिल्ह्याकडे दिली जाते, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तपासणीचे काम आमच्या विभागाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  मुख्यमंत्र्यांना सावरले महाराष्ट्राला  कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सावरण्याचे केले. मुंबईची लोकसंख्या राज्यातील इतर शहराच्या तुलनेत खूप जास्त आहे. तेथे कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम झाले. एकदिलाने काम केल्यास काही अशक्य नाही हे सरकारने दाखवून दिले. महाविकास आघाडीचे सरकार हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आमचे सरकार पहाटे शपथविधी घेणारे नव्हते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com