Agriculture news in Marathi 25,000 per quintal of mango in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये आंबा प्रतिक्विंटल २५ हजार रुपये

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 मार्च 2021

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. गतसप्ताहात आवक १९९ क्विंटल झाली. आवक साधारण असून दरात तेजी पाहायला मिळाली. त्यास १५००० ते ३०००० तर सरासरी २५,००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. गतसप्ताहात आवक १९९ क्विंटल झाली. आवक साधारण असून दरात तेजी पाहायला मिळाली. त्यास १५००० ते ३०००० तर सरासरी २५,००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये पोळ कांद्याची आवक वाढल्याचे दिसून आले. आवक ८५७८ क्विंटल झाली. दरात घसरण झाल्याचे दिसून आले. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १३०० तर सरासरी दर ९५० रुपये राहिला. बटाट्याची आवक १०२४७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १६०० तर सरासरी दर १२५० रुपये राहिला. लसणाची आवक १०६१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २८५० ते ६००० तर सरासरी दर ४६०० रुपये राहिला. आल्याची आवक २५१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १६०० ते २३०० तर सरासरी दर २०००
रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक २४०७ क्विंटल झाली. आवक कमी झाल्याने बाजारभाव सुधारले आहेत. वालपापडीला प्रतिक्विंटल २५०० ते ३८०० असा तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३००० ते ५५०० तर सरासरी दर ४००० रुपये राहिला.हिरव्या मिरचीची आवक ३१८ क्विंटल झाली. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते २८०० तर सरासरी दर २६०० रुपये राहिला. गाजराची आवक २२१३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते ८०० तर सरासरी दर ५५० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ७० ते २०० तर सरासरी १५०, वांगी ५० ते १५० तर सरासरी १२५ व फ्लॉवर ७० ते २०० सरासरी १४५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ३० ते ७५ तर सरासरी ४५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १५० ते २६० तर सरासरी दर २०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २५० तर सरासरी १७०, कारले २५० ते ३५० तर सरासरी ३००, गिलके ३५० ते ४५० तर सरासरी ३६०, भेंडी ३५० ते ५५० तर सरासरी ४५० व दोडका २५० ते ४५० तर सरासरी दर ३०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १५० ते ३५० तर सरासरी २५० रुपये असे २० किलोस दर मिळाले.

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक २१९५ क्विंटल झाली. आवक वाढल्याने दरात घसरण झाली. मृदुला वाणास ५००० ते ७००० तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाला. केळीची आवक ५६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७५० ते १२५० तर सरासरी दर १००० रुपये मिळाला. पपईची आवक ६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १८०० तर सरासरी दर १२०० रुपये होता. द्राक्षांची आवक ७५६ क्विंटल झाली. थॉमसन वाणांस ११०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर १६०० रुपये मिळाला. तर सोनाका सीडलेस वाणांस १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर २९०० रुपये मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...