चांदोली धरणात २५.७२ टीएमसी साठा

फेब्रुवारीअखेर चांदोली धरणात २५.७२ टीएमसी पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत अर्धा टीएमसी साठा कमी असला, तरी चिंता करण्याची गरज नाही, असे येथील सहायक अभियंत्यांनी सांगितले.
25.72 TMC reserves in Chandoli dam
25.72 TMC reserves in Chandoli dam

शिराळा, जि. सांगली ः चांदोली धरणाची पाणीसाठा क्षमता ३४.५० टीएमसी आहे. फेब्रुवारीअखेर चांदोली धरणात २५.७२ टीएमसी पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत अर्धा टीएमसी साठा कमी असला, तरी चिंता करण्याची गरज नाही, असे येथील सहायक अभियंत्यांनी सांगितले.

वारणा जलविद्युत प्रकल्पातून १६, तर चांदोली- सोनवडे प्रकल्पातून ४ मेगावॉट अशी एकूण २० मेगावॉट विद्युतनिर्मिती दोन ठिकाणी केली जात आहे. या धरणातून शेती व पिण्यासाठी वारणा कालवा व वारणा नदीतून पाणी सोडले जाते. तर वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पाणी करमजाई तलावात सोडून त्या ठिकाणाहून कऱ्हाड तालुक्‍यातील व शिराळा तालुक्‍यातील गावांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील दक्षिण मांड व शिराळा तालुक्‍यातील मोरणा नदी काठच्या पिकांना जीवदान मिळू लागले आहे.

गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. कारण मागीलवेळी अतिवृष्टी व परतीचा पाऊस झाला होता. त्या प्रमाणात या वर्षी पाऊस झाला नाही. मात्र सध्या असणारा पाणीसाठा हा मुबलक असल्याने चांदोलीच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने कूपनलिका, विहिरी व पाझर तलावांच्या पाणी पातळीत ही घट होऊ लागली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत ही घाट होणार असली, तरी त्याचा परिणाम शेतीच्या अथवा पिण्याच्या पाण्यावर होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

धरणात गत वर्षाच्या तुलनेत जवळपास अर्धा टी.एम.सी. पाणीसाठा कमी असला तरी धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. - मिलिंद किटवाडकर, सहायक अभियंता, वारणा प्रकल्प

पाणीसाठा फेब्रुवारी २०२० :२६.४० टीएमसी फेब्रुवारी २०२१ : २५.७२ टीएमसी धरणाची पाणी पातळी : ६१७.१५ मीटर पावसाची नोंद : २६८० मिमी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com