Agriculture news in Marathi 25.72 TMC reserves in Chandoli dam | Page 2 ||| Agrowon

चांदोली धरणात २५.७२ टीएमसी साठा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

फेब्रुवारीअखेर चांदोली धरणात २५.७२ टीएमसी पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत अर्धा टीएमसी साठा कमी असला, तरी चिंता करण्याची गरज नाही, असे येथील सहायक अभियंत्यांनी सांगितले.

शिराळा, जि. सांगली ः चांदोली धरणाची पाणीसाठा क्षमता ३४.५० टीएमसी आहे. फेब्रुवारीअखेर चांदोली धरणात २५.७२ टीएमसी पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत अर्धा टीएमसी साठा कमी असला, तरी चिंता करण्याची गरज नाही, असे येथील सहायक अभियंत्यांनी सांगितले.

वारणा जलविद्युत प्रकल्पातून १६, तर चांदोली- सोनवडे प्रकल्पातून ४ मेगावॉट अशी एकूण २० मेगावॉट विद्युतनिर्मिती दोन ठिकाणी केली जात आहे. या धरणातून शेती व पिण्यासाठी वारणा कालवा व वारणा नदीतून पाणी सोडले जाते. तर वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पाणी करमजाई तलावात सोडून त्या ठिकाणाहून कऱ्हाड तालुक्‍यातील व शिराळा तालुक्‍यातील गावांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील दक्षिण मांड व शिराळा तालुक्‍यातील मोरणा नदी काठच्या पिकांना जीवदान मिळू लागले आहे.

गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. कारण मागीलवेळी अतिवृष्टी व परतीचा पाऊस झाला होता. त्या प्रमाणात या वर्षी पाऊस झाला नाही. मात्र सध्या असणारा पाणीसाठा हा मुबलक असल्याने चांदोलीच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने कूपनलिका, विहिरी व पाझर तलावांच्या पाणी पातळीत ही घट होऊ लागली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत ही घाट होणार असली,
तरी त्याचा परिणाम शेतीच्या अथवा पिण्याच्या पाण्यावर होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

धरणात गत वर्षाच्या तुलनेत जवळपास अर्धा टी.एम.सी. पाणीसाठा कमी असला तरी धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही.
- मिलिंद किटवाडकर, सहायक अभियंता, वारणा प्रकल्प

पाणीसाठा
फेब्रुवारी २०२० :२६.४० टीएमसी
फेब्रुवारी २०२१ : २५.७२ टीएमसी
धरणाची पाणी पातळी : ६१७.१५ मीटर
पावसाची नोंद : २६८० मिमी


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...