agriculture news in marathi 26 patient of corona cures and discharged for hospital uptill now | Agrowon

राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१; २६ रुग्ण बरे होऊन घरी

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून असता राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. 

मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून असता राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.  

सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो करोना मुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ६ झाली आहे. 
 
राज्यातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे - 

 • मुंबई    - ७३     (मृत्यू ५)
 • सांगली    - २४    
 • पुणे मनपा -    १९    
 • पिंपरी चिंचवड - १२    
 • नागपूर -    ११    
 • कल्याण - डोबिवली - ७    
 • नवी मुंबई    - ६ (मृत्यू १)    
 • ठाणे - ५    
 • यवतमाळ, वसई विरार     - प्रत्येकी  ४
 • नगर     -  ३
 • सातारा, पनवेल    प्रत्येकी - २
 • उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, ,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया -    प्रत्येकी - १    
 • इतर राज्ये - गुजरात    १    
 • एकूण    - १८१ (मृत्यू ६)    

मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू
राज्यात शनिवारी (ता.२८) एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात शनिवारपर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...