Agriculture news in marathi, 26,000 farmers waiting for crop insurance in Hingoli | Agrowon

हिंगोलीत पीकविम्याच्या प्रतीक्षेत २६ हजार शेतकरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्य हिश्‍याचे अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांना गतवर्षीच्या खरीप हंगामात पीकनुकसानीबद्दल मंजूर १३ कोटी ६७ लाख रुपये एवढ्या परताव्याचे वाटप अजून बाकी आहे.

हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्य हिश्‍याचे अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांना गतवर्षीच्या खरीप हंगामात पीकनुकसानीबद्दल मंजूर १३ कोटी ६७ लाख रुपये एवढ्या परताव्याचे वाटप अजून बाकी आहे.

गतवर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात जिल्ह्यातील ३ लाख ३ हजार शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान, उत्पादनावर आधारित नुकसान आदी निकषांआधारे पात्र १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी ५२ लाख रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४९ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना परताव्याची ८६ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली. परंतु राज्य हिस्स्याचे अनुदान प्राप्त न झाल्यामुळे २६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांचे १३ कोटी ६७ लाख रुपये परताव्याच्या रकमेचे वाटप शिल्लक आहे. 

दरम्यान, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेने केलेल्या मागणीनुसार,  ‘एनडीआरएफ’अंतर्गंत नुकसानभरपाईसाठी कळमनुरी तालुक्यातील ७० गावांतील शेतकऱ्यांच्या याद्या विमा कंपनीस हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित गावातील याद्या प्राप्त होताच त्या कंपनीस हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर विश्लेषण करून अनुदान वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कृषी विभागातर्फे गुरुवारी (ता.१६) देण्यात आले होते.

परंतु, त्यावर समाधान न झाल्यामुळे परिषदेचे जिल्हाध्यक्ष अक्षय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पीकविमा परतावा प्रश्न शुक्रवारी (ता.१७) शेतकऱ्यांनी कळमनुरी - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील कामठाफाटा येथे दीडतास रास्ता रोको आंदोलन झाले. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी पंधरा दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


इतर बातम्या
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...
शेतीपंपाच्या वीज जोडण्या खंडित...नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका...
मराठवाड्याच्या वाट्याला ९ कोटी ९० लाख...औरंगाबाद : राज्यातील मागेल त्याला शेततळे...
सोलापूर जिल्ह्याला शेततळ्यांचे रखडलेले...सोलापूर ः राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे या...
अकोला जिल्ह्यात करडईची साडेसातशे...अकोला ः तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नांदेड विभागात २१ कारखाने सुरुनांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
सांगली जिल्ह्यात महिन्यात साडे पंधरा...सांगली ः जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा १३ साखर...