`एनएचआरडीएफ'कडून उन्हाळ कांद्याचे २६५ क्विंटल बियाणे उपलब्ध

नाशिक : ‘‘राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानने (NHRDF) बिजोत्पादन कार्यक्रमाद्वारे निकष पाळून तयार केलेले २६५ क्विंटल बियाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केले,’’ अशी माहिती संस्थेचे फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी तुषार आंबरे यांनी दिली.
265 quintals of summer onion seeds available from NHRDF
265 quintals of summer onion seeds available from NHRDF

नाशिक : ‘‘सध्या उन्हाळ कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक सध्या कांदा बियाणे उपलब्ध होत नसल्याने शोधाशोध करीत आहेत. या परिस्थितीत मात्र राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानने (NHRDF) बिजोत्पादन कार्यक्रमाद्वारे निकष पाळून तयार केलेले २६५ क्विंटल बियाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केले,’’ अशी माहिती संस्थेचे फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी तुषार आंबरे यांनी दिली. 

मागील वर्षी शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेले बिजोत्पादन अतिवृष्टीमुळे धोक्यात आले. परिणामी चालू वर्षी उन्हाळ कांदा बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला. शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. तर खाजगी कंपन्या व घरगुती विक्री करणाऱ्यांनी दर वाढवले आहेत.

मात्र ''एनएचआरडीएफ''ने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राष्ट्रीय पातळीवर मागणी असलेले ''रेड ३'' व ''ऍग्री फाउंड लाईट रेड''या दोन वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. ''रेड-४''या वाणाची मागणी असते. मात्र बिजोत्पादन कार्यक्रमात ते बाधित झाल्याने पुरवठा करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. 

 इंदोर (मध्यप्रदेश) व राजकोट (गुजरात) या विभागीय कार्यालयातून बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्याची विक्री निफाड तालुक्यातील लासलगाव, चितेगाव व सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी या केंद्रावर होत आहे. यामध्ये ६५, १०० व १०० क्विंटल अशा तीन टप्प्यात २६५ क्विंटल बियाणे आहे. ''रेड-३'' हे बियाणे २३०० रुपये, तर ''ऍग्री फाऊंड'' हे वाण २००० रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध आहे.

बिजोत्पादन कार्यक्रमाद्वारे हे बियाणे विदर्भ व मराठवाडा भागातून नोंदणीकृत बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर उत्पादित होते. ते पुन्हा खरेदी करून शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून देत विक्री केली जाते. यासह शासकीय संस्था, नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांनाही मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येते. 

वाद्यांची ठळक वैशिष्ट्ये

  •     राष्ट्रीय पातळीवरील प्रसारित कांदा वाण 
  •     टणक व मोठ्या आकाराचा कांदा
  •     साठवणूक कालावधी ६ महिन्यापर्यंत
  •     हेक्टरी उत्पादन ३५० ते ४०० क्विंटलपर्यंत
  •     १२० ते १४० दिवसांचा पीक कालावधी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com