वीजेच्या तारा घासल्याने २७ एकर ऊस जळाला

उसाच्या शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांचे घर्षण झाल्याने कौठाळी (ता. पंढरपूर) येथे तोडणीस आलेला २७ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये येथील नऊ शेतकऱ्यांचे जवळपास १५ ते २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
27 acres of sugarcane were burnt due to power outage
27 acres of sugarcane were burnt due to power outage

सोलापूर : उसाच्या शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांचे घर्षण झाल्याने कौठाळी (ता. पंढरपूर) येथे तोडणीस आलेला २७ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये येथील नऊ शेतकऱ्यांचे जवळपास १५ ते २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेस महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करीत नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे सचिन अटकळे यांनी दिला आहे .

कौठाळी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. परंतु या वीज वाहक तारा जुन्या झाल्या आहेत. शिवाय त्या खाली लोंबत असल्याने घर्षण होऊन आग लागण्याचा प्रकार घडला आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष दिले नाही.

अखेर वीज वाहक तारांचे घर्षण होऊन तब्बल २७ एकर उसाच्या फडाला आग लागली. येथील शेतकरी सुरेश वांगडे, रामचंद्र बेंदे, कोंडीबा वांगडे, भारत गोडसे, राजाराम गोडसे, सुनिता गोडसे, गोरख कारंडे, शिवाजी कारंडे या शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला २७ एकर ऊस यामध्ये जळून खाक झाला आहे. आधीच महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठचे शेतकरी संकटात असतानाच पुन्हा वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com