राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी कर्जवाटप 

शेतमाल तारण योजनेत १५ जुलै अखेर ६१ बाजार समित्यांद्वारे १ लाख २९४ क्विंटल शेतमाल तारणातून २ हजार शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले.
godown
godown

पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण योजनेत १५ जुलै अखेर ६१ बाजार समित्यांद्वारे १ लाख २९४ क्विंटल शेतमाल तारणातून २ हजार शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

याबाबतची माहिती देताना पवार म्हणाले, की शेतमाल काढणीच्या हंगामात बाजार समित्यांमध्ये अचानक होणाऱ्या आवकेमुळे शेतमालाचे दर कोसळतात. यामध्ये शेतमालाचा दर्जा चांगला असून देखील चांगले दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्यांद्वारा १९९० पासून शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये ६ टक्के व्याजदराने शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के रक्कम दिली जाते. यावर्षीच्या (२०२०-२१) हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळत असून, भाताला राज्य सरकारने दिलेल्या बोनसमुळे शेतकऱ्यांकडून अल्पप्रतिसाद मिळाला असला तरी, १ लाख २९४ शेतमाल ताणातून शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.‘‘ 

यावर्षीच्या तारण योजनेद्वारे तुरीमध्ये प्रति क्विंटल ६०० ते २ हजार, सोयाबीनमध्ये १ हजार २०० ते ३ हजार ६२५, हळदीमध्ये सरासरी १ हजार ५०० रुपयांचा फायदा मिळाला आहे. तर हरभऱ्यामध्ये ७०० रुपयांपर्यंत वाढ मिळाली आहे, असेही पवार यांनी सांगितले.    या शेतमालाचा आहे समावेश  तूर, मुग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, धान, करडई, ज्वारी, मका, गहू, घेवडा, काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com