agriculture news in Marathi 27 crore loan distribution from crop mortgage scheme Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी कर्जवाटप 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

शेतमाल तारण योजनेत १५ जुलै अखेर ६१ बाजार समित्यांद्वारे १ लाख २९४ क्विंटल शेतमाल तारणातून २ हजार शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले.

पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण योजनेत १५ जुलै अखेर ६१ बाजार समित्यांद्वारे १ लाख २९४ क्विंटल शेतमाल तारणातून २ हजार शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

याबाबतची माहिती देताना पवार म्हणाले, की शेतमाल काढणीच्या हंगामात बाजार समित्यांमध्ये अचानक होणाऱ्या आवकेमुळे शेतमालाचे दर कोसळतात. यामध्ये शेतमालाचा दर्जा चांगला असून देखील चांगले दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्यांद्वारा १९९० पासून शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये ६ टक्के व्याजदराने शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के रक्कम दिली जाते. यावर्षीच्या (२०२०-२१) हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळत असून, भाताला राज्य सरकारने दिलेल्या बोनसमुळे शेतकऱ्यांकडून अल्पप्रतिसाद मिळाला असला तरी, १ लाख २९४ शेतमाल ताणातून शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.‘‘ 

यावर्षीच्या तारण योजनेद्वारे तुरीमध्ये प्रति क्विंटल ६०० ते २ हजार, सोयाबीनमध्ये १ हजार २०० ते ३ हजार ६२५, हळदीमध्ये सरासरी १ हजार ५०० रुपयांचा फायदा मिळाला आहे. तर हरभऱ्यामध्ये ७०० रुपयांपर्यंत वाढ मिळाली आहे, असेही पवार यांनी सांगितले. 
 
या शेतमालाचा आहे समावेश 
तूर, मुग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, धान, करडई, ज्वारी, मका, गहू, घेवडा, काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद 
 


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...