agriculture news in Marathi 270 posts vacant in Sangali district department Maharashtra | Agrowon

सांगलीत कृषी विभागात तब्बल २७० पदे रिक्त

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

सांगली ः शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होते. मात्र, जिल्ह्यातील कृषी विभागात मंजूर ७८६ पदांपैकी सुमारे २७० पदे रिक्‍त आहेत. परिणामी शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सांगली ः शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होते. मात्र, जिल्ह्यातील कृषी विभागात मंजूर ७८६ पदांपैकी सुमारे २७० पदे रिक्‍त आहेत. परिणामी शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाच्या नवनवीन योजनांच्या माहितीसह शेतात विविध पिकांचे प्रात्यक्षिक करून देण्याचे काम कृषी विभागाकडून केले जाते. शेतकऱ्यांचा थेट संबंध कृषी विभागाशी येतो. राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबरोबरच शेतीचे सर्वेक्षण, शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. 

सांगली जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी सहायकाची ३६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावपातळीवर शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देणे कठीण बनले आहे. तालुका कृषी अधिकारी १० पदे मंजूर असून, २ पदे रिक्त आहेत. कृषी विभागातील रिक्‍त पदे भरण्याची मागणी होत असून, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम मात्र विकासावर होत आहे.

कामकाजावर परिणाम...
शेतकऱ्यांच्या संख्येनुसार सांगली जिल्ह्याला अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. एकूण ७८६ पैकी २७० पदे रिक्‍त असल्याने त्याचा परिणाम कामावर होत असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. एका बाजूने शेतीच्या प्रगतीसाठी शासन निधी पुरवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कर्मचारी भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...