राज्यात तीन वर्षांत २७१ बिबट्यांचा मृत्यू

राज्यात तीन वर्षांत २७१ बिबट्यांचा मृत्यू
राज्यात तीन वर्षांत २७१ बिबट्यांचा मृत्यू

नागपूर : प्रजनन आणि संगोपनासाठी ऊस शेती सुरक्षित, तर कुत्रा हे बिबट्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे बिबट्यांचा मानवी वस्ती, वाड्यालागत वावर वाढल्याचे सांगितले जाते. २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत राज्यात एकूण २७१ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. 

जंगलात वाघ आणि रानकुत्र्यांसारखे इतर प्राणीही बिबट्यांचे भक्ष्य पळवितात. या अनुभवातून बिबट्यांनी मनुष्य वस्तीजवळच्या विरळ जंगल परिसरात राहणे पसंत केले आहे. वाघांपासून सुरक्षित रहिवासाची निवड करून बिबटे वस्तीकडे येऊ लागले आहेत.

महाराष्ट्रात रस्ते, विकासकामे, विविध प्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण मोठ्या प्रमाणात होत आहे. वनविभागाच्या परिसरातूनदेखील अनेक रस्ते गेले आहेत. परिणामी कमी होणारे वनक्षेत्र, अन्नाच्या टंचाईमुळे बिबटे गावालगत स्थिरावत आहेत. जंगल क्षेत्रात वाढता मानवी हस्तक्षेप हेदेखील वन्यप्राण्यांचे गाव, शहराकडे येण्याचे कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले.  

आठवड्यातून एकदा तरी शहर, गावात बिबट्या आल्याची घटना पुढे येत आहे. अपघात, नैसर्गिकरीत्या आणि काही प्रमाणात शिकारीच्या माध्यमातून बिबटे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राज्यात ९०० बिबटे वन्यजीव संरक्षणासाठीचे कडक कायदे, त्याची  होणारी प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर नियंत्रण आले आहे. परिणामी राज्यात बिबट्यांची संख्या ८५० ते ९०० पर्यंत पोचल्याचे सूत्रांनी सांगितले.

बिबट्यांचे राज्यातील वर्षनिहाय मृत्यू

२०१६ ८९
२०१७ ८६
२०१८ ९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com