नांदेड जिल्ह्यात २७.५५ टक्के पेरणी : कृषी विभाग

नांदेड जिल्ह्यात २७.५५ टक्के पेरणी
नांदेड जिल्ह्यात २७.५५ टक्के पेरणी

नांदेड : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. ३) २ लाख २७  हजार २०२ हेक्टरवर (२७.५५ टक्के) पेरणी झाली. पेरणी क्षेत्रात सोयाबीन ७९ हजार ७७८ हेक्टर, कपाशी १ लाख १५ हजार ५७९, तर १६ हजार ५४६ हेक्टर तुरीचा समावेश आहे. हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक ६३.५८ टक्के क्षेत्रावर, तर मुदखेड तालुक्यात सर्वांत कमी ०.३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा ८ लाख २४ हजार ८२० हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजित आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यास गतवर्षीपेक्षा उशीर झाला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर रखडलेल्या पेरण्यांना सुरवात झाली. परंतु अजूनही कमी पावसामुळे गावातील पेरण्या खोळंबल्या आहेत. मंगळवारपर्यंत (ता. ३) जिल्ह्यात २ लाख २७ हजार २०२ हेक्टरवर पेरणी झाली.

कपाशीचे लागवड क्षेत्र सर्वाधिक म्हणजे १ लाख १५ हजार ७७९ हेक्टर आहे. त्यानंतर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ७९ हजार ७७८ हेक्टर आहे.

कडधान्यात तूर १६ हजार ५४७६ हेक्टरवर, मूग ६ हजार ५६७, उडीद ३ हजार ५५९ हेक्टरवर आहे. तृणधान्य पिकांत भात १५३ हेक्टर, ज्वारी ४ हजार ४८८ हेक्टर, मका २२१ हेक्टर, गळीत धान्यात तिळाची ११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुखेड, देगलूर, नायगाव, मुदखेड तालुक्यातील पेरणी क्षेत्र ५ टक्केच्या आत आहे. अन्य तालुक्यांत १०.९६ टक्के ते ६३.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

तालुका  पेरणी क्षेत्र  टक्केवारी
नांदेड ८६२६  २६.९५
अर्धापूर ६१२२  २६.९७
मुदखेड ८० ०३४
हदगाव  ३१४९३  ३८.१७
हिमायतनगर २४०५० ६३.५८
माहूर ३१४९३ ५१.६७
किनवट ४३३७७ ५२.९८
भोकर १८७२०  २८.४३
उमरी १४७१७ ४९.७०
धर्माबाद ५१६०  १६.६२
नायगाव २२९३  ४.८२
बिलोली ३६२३   १०.९६
देगलूर ५२६ १.१६
मुखेड ९९९ १.२९
कंधार २१९७०  ३३.८४
लोहा १३५१६ १५.५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com