अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे २८ कोटींचे नुकसान

अकोला : यंदा जिल्ह्यात काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे महसूल, कृषी व जिल्हा परिषद प्रशासनामार्फत संयुक्त पंचनामे करण्यात आले आहेत.
 28 crore crop damage due to heavy rains in Akola district
28 crore crop damage due to heavy rains in Akola district

अकोला :  यंदा जिल्ह्यात काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे महसूल, कृषी व जिल्हा परिषद प्रशासनामार्फत संयुक्त पंचनामे करण्यात आले आहेत. सुमारे ३८ हजार ४६३ हेक्टरवरील पिकांचे २८ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आल्याची माहिती मिळाली आहे. 

जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांनाही अतिपावसाचा फटका बसला. मूग, उडदाचे संपूर्ण पीक हातातून गेले. तर, अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंडं सुद्धा काळी पडली. बागायती शेतीचे सुद्धा नुकसान झाले.

अनेक शेतात पाणी साचल्यामुळे पिके सडली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे.  जिल्ह्यातील १ हजार १६ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. ४९ हजार ८३५ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ४६३.५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे २८ कोटींचे नुकसान झाले आहे.  जून ते ऑगस्ट या कालावधीतील पावसामुळे ३८ हजार ३६५.९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९८२ गावातील ४७ हजार ५३५ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २७ कोटी ८ लाख ८८ हजार १०७ रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येईल. ७ गावांतील ८.२ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त २१ शेतकऱ्यांसाठी १ लाख २४ हजार २०० रुपयांची मागणी करण्यात येईल. 

एक कोटीची मदत मागणार

अतिवृष्टीमुळे तीन गावातील १.७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले. त्यामुळे ५ शेतकऱ्यांना फटका बसला.  त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ३० हजार ६०० रुपयांचा निधी, तर संततधार पावसामुळे २४ गावातील २६६.६५ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त २ हजार २७४ शेतकऱ्यांसाठी ९९ लाख ९९ हजार ३७५ रुपयांची मदत शासनाकडे मागण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com